Saturday, July 27, 2024
Homeनाशिकपर्यटकांना बंगले, तंबु व्यवस्था करणाऱ्यांनो सावधान..!

पर्यटकांना बंगले, तंबु व्यवस्था करणाऱ्यांनो सावधान..!

नाशिक । Nashik

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांनसाठी खाजगी बंगले तसेच पर्यटन कॅम्पचे आयोजन करण्यासाठी तंबुंची व्यवस्था करणारे, जमिन मालक यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांची नियमानुसार माहिती ठेवणे बंधनकार करण्यात आले असून तसे निर्बंध जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी जारी केले आहेत.

- Advertisement -

नववर्षांभीच 1 जानेवारी पासून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 68 प्रमाणे हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशात नमुद केल्यानुसार, अशा ठिकाणांवर पर्यटक म्हणून अतिरेकी किंवा समाजकंठक लोक देखील वास्तव्यास येवू शकतात.

तसेच अशा लोकांकडून सार्वजनिक शांतताभंग करणे, मानवी जिवितास धोका करणे, आरोग्य असुरक्षिता व वित्तहाणी, बॉम्बस्फोट, गोळीबार, दंगली, मारामार्‍या यासारखे प्रकार होण्याची शक्यता आहे. यामुळे अशा गोष्टींवर प्रतिबंध करणे गरजेचा असल्याने खाजगी बंगले व पर्यटन कॅम्प आयोजकांसाठी आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

त्यानुसार, खाजगी बंगले, फार्म हाऊस यांचे मालक, कॅम्पचे आयोजन करणारे जागा मालक यांनी पर्यटक किंवा अतिथी यांना बंगला किंवा जागा भाडे तत्वावर देतांना पोलीसांनी बंधनकारक केलेल्या नियम व कॉलमनुसार माहिती रजिस्टर मध्ये नोंदवणे बंधनकारक असणार आहे.

यात पर्यटक अथवा अतिथी यांची एकूण संख्या, सर्वांची नावे, पत्ते, ओळखपत्रे, सर्वांचे मोबाईल क्रमांक, ज्या वाहनातून आले त्या वाहनाचा क्रमांक, पर्यटक किंवा अतिथी हे कोठून आले, आल्याचा दिनांक व जाण्याचा दिनांक व स्वाक्षरी आदी बाबींची नोंद घेण्यात यावी.

पर्यटक व अतिथी यांचे आधार कार्ड किंवा कोणत्याही स्वरूपाचे ओळखपत्र घेवून त्याचे रॅकॉर्ड ठेवणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती अथवा उल्लंघन करणारी संस्था महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 140 अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व सदर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार हे प्राधिकृत असतील, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी शासकीय आदेशान्वये कळविले आहे.

सीसीटिव्हीचे रेकॉर्ड 30 दिवस

पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणारे बंगले, फार्म हाऊस तसेच तंबुच्या ठिकाणी उच्च प्रतीचे सीसीटिव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक असणार आहे. याची माहिती सबंधीत पर्यंटकांना देऊन त्यांना सुचीत करण्याच्याही सुचना आहेत.

तसेच सीसीटिव्ही फुटेजचे रॅकॉर्डींग डिव्हीआर किंवा एनव्हिआर हे 30 दिवसांपर्यंत राहील असे ठेवावे लागणार आहे. यामध्ये कुचराई करणारांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या