येवला | प्रतिनिधी Yeola
नायलॉन मांजाने तालुक्यातील हडपसावरगाव येथील पोलीस पाटील अमोल बाबासाहेब कोल्हे (वय ३४) गाल व कान कापल्या गेल्याने जखमी झाले आहे. येवला येथून पोलिस पाटील आढावा बैठक आटोपून घरी परतत असताना गणेशपुरी शिवारात सदर घटना घडली.
- Advertisement -
दरम्यान, जखमी कोल्हे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचेवर सुमारे ४० टाके घालण्यात आल्याचे डॉ. राहुल चंडालीया यांनी सांगितले. शहरात गेल्या पंधरा दिवसांत नायलॉन मांजाने तीन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा