Saturday, May 25, 2024
Homeनगरहवालदाराने मागितली दोन हजाराची लाच; 'लाचलुचपत'नं पकडलं रंगेहात

हवालदाराने मागितली दोन हजाराची लाच; ‘लाचलुचपत’नं पकडलं रंगेहात

श्रीरामपूर | प्रतिनिधी

शहर पोलीस ठाण्यातील (Shrirampur Police Station) पोलीस हवालदारास दोन हजार रुपयाची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन ही कारवाई केली.

- Advertisement -

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन वार्ड क्र. 3 च्या बीट चौकीवर नेणुकीस असलेले संजय काळे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. या घटनेने पोलीस वार्तुळात खळबळ उडाली आहे. (Police Personnel Caught Red-Handed While Accepting A Bribe in Shrirampur)

बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

तक्रारदार यांचे नातवावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भा. दं. वि. कलम 392 च्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व चार्जशिटसाठी संजय काळे यांनी तक्रारदाराकडे 2000 रपयांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील बिट चौकी न 3 चे कार्यालय येथे स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.

महापालिकेतील ‘पांढर्‍या हत्तीं’चा चांदबिबी महालावर होणार कडेलोट… संघटना का आक्रमक?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील यांच्या समवेत पोलीसा नाईक प्रकाश महाजन, एकनाथ बाविस्कर, पळशीकर यांनी हा सापळा यशस्वीपणे पार पाडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या