अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 48 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी याबाबत आदेश काढले आहेत. दरम्यान, यामध्ये विभागीय चौकशी व न्यायालयीन कार्यवाही प्रलंबित असलेल्या 20 जणांचा समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या पदोन्नतीच्या निर्णयान्वये व सर्वोच्च न्यायालयात दाखल अनुमती याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून ही पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 48 अंमलदारांना पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार या पदावर सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरती दिनांकापासून पदोन्नती आदेश निर्गमीत झाले दिनांकापासून पदोन्नती देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, यामध्ये 20 अंमलदारांची विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन कार्यवाही सुरू असल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांसाठी किंवा विभागीय चौकशी/न्यायालयीन कार्यवाही अंतिम होईल यापैकी जे आगोदर होईल तेवढ्या कालावधीसाठी अटींच्या अधिन राहून निव्वळ तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे, असे देखील आदेशात नमूद केले आहे.
पदोन्नती मिळालेले पोलीस नाईक व कंसात नेमणुकीचे ठिकाण : वैभव साळवे (पाथर्डी), राजकुमार सुर्यवंशी (पोलीस मुख्यालय), विष्णू भागवत (एमआयडीसी), रामदास सोनवणे (पाथर्डी), संभाजी घायतडक (मोटार परिवहन विभाग), संगीता खेमनर (आश्वी), दुर्गा कांदळकर (शेवगाव), कावेरी घुले (नियंत्रण कक्ष), सचिन उगले (संगमनेर तालुका), सलिम शेख (अहिल्यानगर तालुका), ईश्वर गर्जे (शेवगाव), बाळासाहेब तागड (सोनई), संदीप आव्हाड (शेवगाव), आदीनाथ वामन (शेवगाव), संभाजी बडे (राहुरी), बापुसाहेब गोरे (कोतवाली), निता अडसरे (कोतवाली), अदिनाथ मुळे (अहिल्यानगर तालुका), अनिता मरभर (तोफखाना), संजय माने (नेवासा), कृष्णा कुर्हे (शिर्डी), सतीष काटे (कोपरगाव शहर), ज्ञानेश्वर सोनवणे (पोलीस मुख्यालय), राहुल सोळुंके (एलसीबी), संध्या म्हस्के (तोफखाना), धर्मराज दहिफळे (अहिल्यानगर तालुका), किशोर लाड (अहिल्यानगर तालुका), सचिन धनाड (शिर्डी), अंकुश बोडखे (नियंत्रण कक्ष), संजय डाळींबकर (पोलीस मुख्यालय), अण्णा पवार (पाथर्डी), महेश पालवे (मोटार परिवहन विभाग), सोमिनाथ बांगर (पाथर्डी), अरविंद भिंगारदिवे (पाथर्डी), रामनाथ सानप (राहुरी), चांगदेव आंधळे (तोफखाना), अरूण गांगर्डे (नेवासा), बाबासाहेब सातपुते (पोलीस मुख्यालय), संदीप पांडे (पोलीस मुख्यालय), अजित घुले (अकोले), गुलाब मोरे (श्रीगोंदा), बापुराव देशमुख (पोलीस मुख्यालय), संदीप धामणे (खर्डा), संतोष खैरे (सायबर), रवींद्र कर्डिले (साई मंदिर सुरक्षा, शिर्डी), प्रवीण अंधारे (कर्जत), बाळासाहेब बाचकर (सोनई), भाऊसाहेब सानप (साई मंदिर सुरक्षा, शिर्डी).