Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Crime News : सिन्नरमध्ये अवैध धंदे; पोलिसांकडून चार कॉफी शॉप उद्ध्वस्त

Nashik Crime News : सिन्नरमध्ये अवैध धंदे; पोलिसांकडून चार कॉफी शॉप उद्ध्वस्त

सिन्नर । अमोल निरगुडे |Sinnar

शहरातील चौदाचौक वाडा परिसरातील सांगळे कॉम्प्लेक्स आणि सिन्नर बसस्थानक परिसरात असलेल्या कॉफी शॉपमध्ये (Coffee Shop) अवैद्य धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने (Nashik Rural Crime Branch Team) आज (दि.१६ ) सायंकाळी छापा (Raid) टाकत तीन कॉफी शॉप उद्ध्वस्त केले आहेत. या कॉफी शॉपमध्ये तब्बल ५० ते ६० वापरलेले निरोध आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

काँग्रेसला नाशकात ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा; शहराला कायम अध्यक्ष नसल्याने नाराजी

काही वर्षांपासून सिन्नर शहरात (Sinnar City) ठिकठिकाणी कॉफी शॉपच्या नावाखाली अवैध धंदे (illegal trades ) सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा या कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करण्याबरोबरच अत्याचार होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच काही कॉफी शॉपमध्ये मुलींकडून आत्महत्या (Suicide) केल्याच्याही घटना काही वर्षात घडल्या आहेत. नुकतेच एका कॉफी शॉपमध्ये अल्पवयीन मुलीवर (Girl) अत्याचार झाल्याची घटना घडली होती. संशयित आरोपींनी चक्क मुलीच्या भावाला आपल्या सख्ख्या बहिणीवरच अत्याचार करण्यास भाग पाडल्याचे यात निष्पन्न झाले होते. यानंतर आरोपींनी या मुलीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला होता. अत्याचार सहन न झाल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात (Police Station) तिघांविरोधात फिर्याद दिली होती. मात्र, त्यातील मुख्य आरोपी फरार झाला असून दोघांना पोलिसांनी अटक (Arrested) केली केली आहे.

शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या या कॉफी शॉपमध्ये अवैध धंदे होत असल्याची माहिती सिन्नर पोलीस ठाण्याला (Sinnar Police Station) माहीत असूनही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सिन्नर पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एका इसमाने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांच्याकडेच याबाबत तक्रार केल्याचे कळते. त्यानंतर उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि.१६) सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने थेट सिन्नर गाठत सांगळे कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या तीन कॉफी शॉपवर आणि सिन्नर बसस्थानक परिसरात एका ठिकाणी छापा टाकला. अचानक छापा पडल्याने कॉफी शॉप चालकांची चांगली धांदल उडाली. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला.

Dasara Melava : मोठी बातमी! ठाकरेंचा ‘शिवाजी पार्क’वर तर शिंदेंच्या शिवसेनेचा ‘या’ ठिकाणी होणार दसरा मेळावा

यावेळी कॉफी शॉपमध्ये ९ ते १० अल्पवयीन मुले-मुलीही आढळून आले. सदर कॉफी शॉपमध्ये छोटे-छोटे कंपार्टमेंट करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. या कंपार्टमेंटमध्ये बसण्यासाठी सोफ्याची व बेडचीही व्यवस्था करण्यात आली होती. अंधारमय असणाऱ्या या कंपार्टमेंटमध्ये मुले व मुली अश्लील चाळे करत असल्याचे या प्रकारातून दिसून आले. कॉफी शॉप केवळ नाव असून या शॉपमध्ये कॉफी किंवा चहाचा प्रकार कुठलाही प्रकार दिसून आला नाही. या कंपार्टमेंटमध्ये बसण्याचे तासाला २०० ते ३०० रुपये चार्ज लावण्यात येत असल्याची माहिती यावेळी उघडकीस आली.

तसेच कॉफी शॉपची झडती घेतली असता या ठिकाणी तब्बल ५० ते ६० वापरलेले निरोध सर्वत्र पडल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत गिलबिले, विनोद टिळे, शांताराम नाठे, दीपक अहिरे, दिनेश बागुल, संदीप नागपुरे यांनी तिन्ही कॉफी शॉपमधील सर्व साहित्य उध्वस्त केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाच्या या कारवाईमुळे शहरातील कॉफी शॉप चालकांचे धाबे दणाणले आहे. तर सामान्य नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे (Action) स्वागत करण्यात येत आहे.

Nashik News : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील ८५ गुन्हेगारांची तपासणी

सिन्नर पोलिसांची संशयास्पद भूमिका

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार सिन्नर पोलिसांकडून गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित करण्यात येत होता. त्यामुळे या कॉफी शॉप चालकांचे चांगलेच फावत होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील मुले-मुलीही बिनधास्तपणे या कॉफी शॉपमध्ये येऊन अश्लील चाळे करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच छापा टाकण्यात आलेल्या एका कॉफी शॉपमध्ये सापडलेल्या एका डायरीमध्ये चक्क कोणत्या पोलिसाला किती रुपयांचा हप्ता देण्यात आला आहे याविषयीही नोंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे सिन्नर पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांमधून संशय व्यक्त केला जात आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Ajit Pawar : भाजप पाठिंब्यावर अजित पवार मुख्यमंत्री?

- Advertisment -

ताज्या बातम्या