Monday, May 27, 2024
HomeनाशिकSinnar Crime News : भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश; लाखोंचा साठा हस्तगत

Sinnar Crime News : भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश; लाखोंचा साठा हस्तगत

वावी | संतोष भोपी | Vavi

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) मिरगाव (Mirgaon) येथे मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोडयापासून (Milk Powder and Caustic Soda) भेसळयुक्त दूध (Adulterated Milk) बनवणाऱ्या डेअरीवर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने छापा (Raid) टाकून ११ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (दि.०२ सप्टेंबर) रोजी सकाळच्या सुमारास वावी पोलीस ठाणे (Vavi Police Station) हद्दीतील मिरगाव येथील दूध संकलन केंद्रात काही इसम संशयास्पदरित्या ०२ किटल्यांमधून पांढऱ्या रंगाचे द्रव पदार्थाचे मिश्रण दूधात मिसळत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलीसांच्या (Rural Police) विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिरगाव येथील ओम सदगुरू दूध संकलन केंद्रावर छापा टाकला.

Nashik News : गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख यांचे अपहरण

त्याठिकाणी डेअरी चालक संतोष विठ्ठल हिंगे आणि प्रकाश विठ्ठल हिंगे, (रा. मीरगाव ता. सिन्नर) हे त्यांच्या दूध संकलन केंद्रात संकलित झालेल्या दूधात पांढरे रंगाचे द्रव पदार्थाचे मिश्रण टाकतांना मिळून आले. यानंतर पोलीसांनी (Police) पंचासमक्ष झडती घेतली असता त्याठिकाणी मिल्की मिस्ट नावाची रासायनिक पावडर व कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कॉस्टिक सोडा मिळून आला. त्यानंतर पोलीस पथकाने डेअरी चालकाच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी कॉस्टिक सोडा व डेअरीच्या दूधात मिक्स करण्यासाठी वापरण्यात येणारी स्किम मिल्क पावडरचा साठा आढळून आला.

यानंतर डेअरी चालकास मिल्की मिस्ट पावडरचा पुरवठा करणाऱ्या हेमंत श्रीहरी पवार (रा. उजणी, ता.सिन्नर) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या गोडाऊनची झडती घेतली असता तेथे सुमारे ३०० गोण्या स्किम मिल्क पावडर व ०७ गोण्या कॉस्टिक सोडा असा एकूण ११ लाख रूपये किंमतीचा साठा आढळून आला आहे. त्यानंतर याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक यांच्या मदतीने कारवाई सुरू असून वावी पोलीस ठाण्यात संबधितांविरुद्ध भादवि कलम ३२८ व अन्न भेसळ अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hockey Asia Cup 2023 : भारतीय हॉकी संघाने जिंकला ‘आशिया चषक’, पाकिस्तानला धूळ चारत दमदार विजय

दरम्यान, ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील विशेष पथकातील पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सपोनि प्रल्हाद गिते, सपोउनि शांताराम नाठे, दिपक आहिरे, पोकॉ विनोद टिळे, गिरीष बागुल, अनुपम जाधव, मेघराज जाधव, किशोर बोडके, साईनाथ सांगळे, भगवान काकड, मपोकॉ सविता फुलकर, चालक हेमंत वाघ यांच्या पथकाने करण्यात मोलाची कामगिरी बजावली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

“सनातन धर्म हा मलेरिया-डेंग्यूसारखा, याला…”; तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं खळबळजनक वक्तव्य

- Advertisment -

ताज्या बातम्या