Monday, July 27, 2026
HomeनगरCrime News : पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवतीसोबत गैरवर्तन; गुन्हा दाखल

Crime News : पोलीस भरतीची तयारी करणार्‍या युवतीसोबत गैरवर्तन; गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी येथील बालिकाश्रम रस्ता परिसरात रूमवर राहणार्‍या युवतीसोबत एका मुलाने गैरवर्तन केल्याची घटना शुक्रवारी (22 मे) मध्यरात्री घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

मुळची जामखेड तालुक्यातील युवतीने यासंदर्भात शनिवारी (23 मे) फिर्याद दिली आहे. फिर्यादी सध्या बालिकाश्रम रस्ता परिसरात भाड्याच्या खोलीत राहून पोलीस भरतीचा सराव करते. घटनेच्या रात्री तिच्या खोलीतील इतर मुली गावी गेल्या असल्याने ती खोलीत एकटीच होती. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शेजारच्या खोलीत राहणार्‍या एका मुलाने खिडकी वाजवून पिण्यासाठी पाणी मागितले. युवतीने शेजारी म्हणून ओळखीपोटी दरवाजा उघडून त्याला पाण्याची बाटली दिली. पाणी घेतल्यानंतर तो मुलगा बाहेर न जाता जबरदस्तीने खोलीत घुसला.

युवतीने त्याला बाहेर जाण्यास सांगितले असता, त्याने तिला आत ढकलून तिचा विनयभंग केला. युवतीने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने तो मुलगा तेथून पळून गेला. या घटनेमुळे प्रचंड घाबरलेल्या युवतीने सकाळी आपल्या नातेवाईकांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित मुलाला पकडले आणि तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. पीडित युवतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास महिला पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ​’गट्ट्या’ची हुलकावणी संपली! चोरी प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik रेकॉर्डवरील पसार संशयितांचा (Suspected) शोध घेण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत नाशिक शहर गुन्हेशाखा (Nashik City Unit) युनिट-२ च्या पथकाने कारवाई...