Thursday, May 7, 2026
HomeनगरPolice Recruitment : लेखी परीक्षेसाठी 934 उमेदवार पात्र

Police Recruitment : लेखी परीक्षेसाठी 934 उमेदवार पात्र

73 पदासांठी पोलीस भरती || हरकतींसाठी 3 मार्चपर्यंत मुदत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील 73 रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीतून 934 उमेदवार लेखी परीक्षेसाठी तात्पुरते पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून उमेदवारांना तपशील तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, शासन तरतुदीनुसार 1:10 या प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी संधी देण्यात आली आहे. नियमानुसार दहाव्या क्रमांकावर असलेल्या व एकसमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांना देखील लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविले आहेत.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस घटकाच्या आस्थापनेवरील 73 रिक्त पदांसाठी 11 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान येथील पोलीस मुख्यालयात उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी एकूण 4 हजार 148 उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 497 उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी दिली.

मैदानी चाचणीत सहभागी झालेल्या उमेदवारांपैकी 1 हजार 380 उमेदवारांना 25 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. शासनाच्या 1:10 या नियमानुसार, उपलब्ध 73 पदांच्या प्रमाणात 934 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी तात्पुरते पात्र घोषित करण्यात आले आहे. लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या 934 उमेदवारांची यादी जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आपले नाव, चेस्ट क्रमांक व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यादीसंदर्भात काही आक्षेप किंवा हरकती असल्यास उमेदवारांनी अधिकृत ईमेलवर 3 मार्च 2026 पर्यंत लेखी स्वरूपात हरकती सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर प्राप्त होणार्‍या आक्षेपांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, लेखी परीक्षेची तारीख व पुढील प्रक्रियेबाबतची माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

ताज्या बातम्या

Sangamner : हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ 70 लाखांचा गुटखा जप्त

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ मंगळवारी (दि. 5 मे) सकाळी सुमारे 11.30 वाजता स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर...