येवला | प्रतिनिधी | Yeola
शहरातील पिंजारगल्ली (Pinjar Galli) भागातील एका घरातून ४ तलवारी (Swords) पोलिसांनी (Police) जप्त केल्या असून संशयितास अटक केली आहे. शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती वरुन शनिवारी, (दि. ३) रात्रीच्या सुमारास पिंजारगल्ली भागातील (Pinjar Galli) मुज्जमिल खलील शेख उर्फ इल्लु बटाटेवाला (३४) याचे घरी छापा टाकला.
यावेळी घरातून काळया रंगाची ३ ठिकाणी स्टीलचे पत्रे असलेली म्यान व त्यामध्ये ६७ से.मी. लोखंडी पाते त्यावर स्टीलची पॉलिश असलेली १४ से मी मुठ असलेली अंदाजे ३ हजार रुपयांची तलवार, काळया रंगाचे म्यान असलेली चपटी व सरळ लोखंडी तलवार अंदाजे किंमत ३ हजार, एक चॉकलेटी रंगाची म्यान त्यावर स्टीलची पटटी असलेले वक्राकार पाते व मुठ असलेली स्टीलचे आवरण असलेली लोखंडी तलवार अंदाजे किंमत ३ हजार, एक लाकडी पॉलिश पिवळया धातुच्या पटटया असलेली मॅन व त्यात वक्राकार पाते असलेली पिवळया धातुची मुठ असलेली असलेली लोखंडी तलवार असा एकूण १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला.
दरम्यान, शस्त्र अधिनीयम १९५९ च्या कलम ४/२५ व जिल्हाधिकारी नाशिक (Collector Of Nashik) यांनी काढलेले महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे शहर पोलिसात मुज्जमिल शेख याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार सी. पी. मोरे हे करत आहेत.