Wednesday, June 26, 2024
Homeक्राईमNashik Crime News : कट्टा विक्री आले अंगलट; सराईताकडून दोन गावठी पिस्तूल...

Nashik Crime News : कट्टा विक्री आले अंगलट; सराईताकडून दोन गावठी पिस्तूल जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

उपनगर भागात (Upnagar Area) गावठी कट्टे विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुंडाला जेरबंद करण्यात आले आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व काडतुसे जप्त केली आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन ओमचंद कागडा (२५, रा. उपनगर मनपा हॉस्पिटलशेजारी, उपनगर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. अंमलदार प्रदीप म्हसदे, विशाल देवरे हे गस्तीवर असताना त्यांना सराईत गुन्हेगार हा उपनगर मनपा बिल्डिंगजवळ गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सहा कोटी रुपये उकळले

त्यानुसार, रविवारी (दि. १६) दुपारी सापळा रचून सराईत सचिन यास अटक करण्यात आली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात येऊन संशयिताला उपनगर पोलिसांच्या (Upnagar Police) हवाली करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : हार्ट केअरमधील स्वागतिकेने केला ‘इतक्या’ लाखांचा अपहार

दरम्यान, सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, समाधान पवार यांनी बजावली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या