Wednesday, March 26, 2025
HomeनाशिकNashik Crime News : स्वत:वर गोळी झाडून दुय्यम पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

Nashik Crime News : स्वत:वर गोळी झाडून दुय्यम पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

नाशिक | Nashik

अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) पोलीस निरीक्षक अशोक नजन (Ashok Najan) यांनी त्यांच्या कार्यालयात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Suicide)केल्याची दुर्दैवी घटना आज (मंगळवारी) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अशोक निवृत्ती नजन (४८,रा.गुरु गोविंद शाळेच्या मागे,इंदिरा नगर,नाशिक) यांनी मंगळवार (दि.२०) सकाळी पोलीस ठाण्याच्या त्यांच्या कार्यालयात सकाळी साडेनऊ ते पाउणेदहा वाजेच्या दरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात अंमलदारांची हजेरी सुरु होती.

त्यानंतर हवालदार शरद झोले हे हजेरीचा अहवाल देण्याकरिता नजन यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना नजन यांच्याकडे बघून त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा असे प्रथमदर्शनी वाटले. मात्र, नंतर त्यांच्या नाकातून रक्त येतांना त्यांना दिसले. यावेळी झोले यांनी तात्काळ पोलीस ठाण्याच्या आवारात पळत जाऊन इतर अंमलदारांना आवाज देवून नजन यांच्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर सर्वांना नजन यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडल्याचे दिसून आले.

दरम्यान, याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर नजन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्यांनी आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस घेत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘राष्ट्रीय कृषी विकास’ मध्ये 43 कोटी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सरकारच्यावतीने राबवण्यात येणार्‍या कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत जिल्ह्यासाठी 43 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे मार्चअखेर शेतकर्‍यांच्या...