Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik News : गर्दुल्यामुळे यंत्रणा चक्रावली; सिव्हिलमध्ये 'कालू'ने घातला शेअर चॅटच्या व्हिडीओचा...

Nashik News : गर्दुल्यामुळे यंत्रणा चक्रावली; सिव्हिलमध्ये ‘कालू’ने घातला शेअर चॅटच्या व्हिडीओचा गोंधळ

नेमकं काय घडलं?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) महिलांचा व्हिडिओ केल्याच्या तक्रारीवरुन पोलिस (Police) एकाला ताब्यात घेऊन प्रसाद देतात… ‘माझा भाचा ॲडमिट आहे’, असं सांगत तो एक मोबाइल क्रमांक देतो… पोलिस अंमलदार त्यावर फोन करुन ‘कालूचा भाचा… इथे चौकीत ये…’, असा सज्जड दम भरतात… तिकडून मात्र थेट ‘मी कालूचा भाचा नव्हे, पीएसआय बोलतोय…’, अशी बतावणी होते. त्यावरुन एका गर्दुल्यामुळे गुरुवारी (दि. २३) सायंकाळी सिव्हिलच्या चौकीत पोलिस यंत्रणाही चक्रावल्याचे दिसून आले.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी (Security Guards) एका तरुणाला पोलिस चौकीत हजर केले. ‘सर, याने महिला वॉर्डमध्ये व्हिडिओ तयार केलेत’, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. चौकीतील पोलिसांनी तरुणाचा मोबाईल ताब्यात घेत व्हिडिओ तपासले. महिला वॉर्डमध्ये जेवण वाढताना झालेल्या गर्दीचा व्हिडिओ त्याने काढून स्नॅपचॅटवर ऑनलाईन रेकॉर्ड केल्याचे दिसल्याने पोलिसांनी तरुणाच्या दोन-तीन कानशिलात लगावल्या. त्याला ‘व्हिडिओ का केला’, याबाबत प्रश्न विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

यानंतर पोलिसांनी चांगलाच दणका दिल्यावर ‘माझा भाचा ॲडमिट आहे. त्याला शोधत होतो. सहज व्हिडिओ केला. मी गुन्हेगार नाही. व्हिडिओमध्ये काही आक्षेपार्ह नाही’, अशी सराईत उत्तरे त्याने दिली. शिवाय भाच्याचा क्रमांकही पोलिसांना दिला. पोलिसांनी फोन लावत विचारणा केल्यावर त्याने आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या एका उपनिरीक्षकाचा क्रमांक दिल्याचे उघड झाले. त्यावरुनही पोलिसांनी त्याला चांगलेच टोले लगावले. तेव्हा ‘अहो, बॉसनी मला ओळखलं नसेल… मी कालू आहे’, असेच त्याचे म्हणणे सुरु होते. पोलिसांनी त्याला थोडा प्रसाद देत व्हिडिओ डिलिट करुन हाकलून दिले.

‘नुसती नशा, नुस्ताच राडा’

तरुणाने पोलिसांना ‘कालू (रा. भारतनगर)’ असे नाव सांगितले. दुपारीच एका मद्य दुकानाबाहेर धिंगाणा घातल्याने मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही बतावणी केली. विशेष म्हणजे, अनेक पोलिसांची नावे घेत त्याने ओळखी दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा गर्दुल्या असून वेळोवेळी पोलिसांनी त्याला चोप दिल्याचे समोर आले. यानंतर सिव्हिलच्या बाहेर पडताच त्याने पुन्हा मोबाईल सुरु करुन स्नॅपचॅटवर बाहेरचा व्हिडीओ बनविणे सुरु केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या