Saturday, May 4, 2024
Homeनगररश्मी शुक्लांच्या रिपोर्टमध्ये नगरच्या एसपींचे नाव

रश्मी शुक्लांच्या रिपोर्टमध्ये नगरच्या एसपींचे नाव

अहमदनगर (प्रतिनिधी) –

राज्य पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेट संदर्भात गुप्तचर विभागाच्या सीपी रश्मी शुक्ला यांनी तयार केलेल्या अहवालात (रिपोर्ट) नगरचे

- Advertisement -

एसपी मनोज पाटील यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात पाटील यांच्यासह आणखी 29 नावांचा समावेश असल्याचे समजते.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र पडणवीस यांनी पोलीस दलातील या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांना देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तत्कालीन आयुक्त शुक्ला आणि पोलीस महासंचालक, गृहविभागाचे अतिरिक्त सचिवांमधील गोपनीय पत्रव्यवहार फडणवीस यांनी उघड केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद आता नगरपर्यंत पोहचले आहे. नगरचे एसपी मनोज पाटील यांच्यासह राज्यातील 29 पोलीस अधिकार्‍यांच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

शुक्ला यांच्या पत्रात महादेव इंगळे हे बदली रॅकेटचे सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. इंगळे हे पोलीस अधिकारी व नेत्यांच्या नावाचा वापर करून लाखो रुपये घेऊन बदल्यांचे काम करत होते. त्यामुळेच इंगळे व त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकार्‍यांचे फोन गुप्तचर विभागाने टॅप केल्याचे पत्रात नमूद केले आहे. बदल्या आणि प्रमोशनसाठी लाखो रुपयांचे व्यवहार समोर आल्याने त्याची चौकशी करावी अशी मागणी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे केली होती. शुक्ला यांचे ते पत्र (रिपोर्ट) विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी उघड केल्यानंतर त्यातील नावे समोर आली आहे. त्यात सोलापूरचे तत्कालीन आणि नगरचे एसपी मनोज पाटील यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या