Saturday, October 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, इंडिया आघाडीचे १० खासदार राष्ट्रपतींच्या भेटीला

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, इंडिया आघाडीचे १० खासदार राष्ट्रपतींच्या भेटीला

राहुल गांधी राष्ट्रपती भवनाकडे रवाना; प्रियंका गांधींसह खासदारांचा विजय चौकात ठिय्या

- Advertisement -

नवी दिल्ली :

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांची बैठक झाल्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या खासदारांना पोलिसांनी अडवल्याने विजय चौकात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या पत्रावर खासदारांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर राहुल गांधी आणि इतर खासदार राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी रवाना झाले. या भेटीसाठी रात्री आठ वाजताची वेळ मागण्यात आली होती.

मात्र, राष्ट्रपतींच्या भेटीसाठी केवळ दहा खासदारांच्या शिष्टमंडळालाच परवानगी मिळू शकते, असे सांगण्यात आल्यानंतर पोलिसांनी इतर खासदारांना पुढे जाण्यापासून रोखले. यामुळे विजय चौकात खासदारांनी ठिय्या दिला. प्रियंका गांधी यांच्यासह इतर खासदार विजय चौकात थांबले असून, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, राहुल गांधी आणि निवडक दहा नेते राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी पायी रवाना झाल्याची माहिती आहे. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे.

खासदारांनी यावेळी ज्ञानेश कुमारांच्या अटकेचीही मागणी केली आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, मनोज झा, एम. ए. बेबी, डी राजा, राजीव राय, ओमर अब्दुल्ला, थोर थिरूवलम या सर्व १० नेत्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला गेलं आहे.

ताज्या बातम्या

पोलिसांना खबर्‍या देतो का? असे म्हणून एकाला कोयता, कुर्‍हाडीने मारहाण करुन...

0
नेवासा |वार्ताहर| Newasa तू पोलिसांना आमच्या खबर्‍या देतो का? असे म्हणून शनिवारी पहाटे झोपेत असलेल्या तरुणाला 10 जणांनी मारहाण करुन त्याच्यावर बंदुकीची गोळी झाडल्याची घटना...