Wednesday, May 22, 2024
HomeनाशिकNashik News : बचत गट कार्यक्रमाच्या बॅनरवर राजकीय अतिक्रमण

Nashik News : बचत गट कार्यक्रमाच्या बॅनरवर राजकीय अतिक्रमण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बचत गटांच्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाच्या बॅनरवर राजकीय अतिक्रमण झाल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनेच असे केल्याने बचतगटांना बाजारपेठ कशी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे…

- Advertisement -

जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या आवारात बचत गटाच्या वस्तूंच्या प्रदर्शन सुरू आहे. सोमवारी (दि १४) रोजी पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते.

पावसाचा जोर वाढणार! ‘या’ भागाला मिळाला अलर्ट… वाचा, काय म्हटलंय हवामान विभागानं?

त्र्यंबक रोडवरील पंचायत समितीच्या आवारात हे प्रदर्शन सुरू आहे. बचत गटाच्या महिलांना रोजगार मिळावा, त्यांच्या वस्तूंना बाजार पेठ मिळावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

Viral Video: अपघाताचा थरार! दुचाकीवरील दोघांना धडक, ३ किमीपर्यंत फरपटत नेली बाईक

प्रदर्शनाची माहिती जिल्हावासियांना व्हावी, यासाठी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर मोठा फलक लावण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीमधून नाशिक शहर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने या फलकावरच अतिक्रमण केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Bomb Threat Call: दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवले

- Advertisment -

ताज्या बातम्या