Wednesday, May 29, 2024
HomeनाशिकMaratha Reservation : नाशिक जिल्ह्यातील 'इतक्या' गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी

Maratha Reservation : नाशिक जिल्ह्यातील ‘इतक्या’ गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठा आरक्षणामुळे (Maratha Reservation) नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पाचशे गावात गावबंदीचे लोण पसरले असून तीनशे गावातून पाठींब्यांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे हळूहळू हे लोण संपूर्ण जिल्ह्यात पसरले असून सकल मराठा समाज बांधव आता आरक्षणासाठी पेटून उठल्याचे दिसत आहेत…

- Advertisement -

गेल्या ४९ दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik) मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील हे नाशिक दौर्‍यावर आले होते. तेव्हा त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. यावेळी अनेक ग्रामपंचायती तसेच विविध जाती समुदायांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ पत्रे दिली होती. यानंतर नाशिक जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला.

Nashik News : आमदार सीमा हिरेंच्या कार्यालयाबाहेर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यासमोर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून आता गावबंदी सुरू झाली आहे. तर मराठा आरक्षणप्रश्नी व्यापक जनजागृतीसाठी रविवारपासून गावोगावी बैठकांचे सत्र राबविले जात आहे. या आंदोलनात लोकसहभाग वाढविला जात आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनात विविध संस्था, ग्रामस्थ, विविध समुदायांतील मंडळी थेट भेट देऊन समाजाच्या आरक्षणास लेखी पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३०० हून अधिक पाठिंब्याची पत्रे मिळाली आहेत.

दरम्यान, ही सर्व पत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना निवेदनासोबत पाठविली जाणार आहेत. मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढत आहे. मात्र, निष्क्रिय आमदार, खासदार, मंत्री व आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. आता हा निर्वाणीचा लढा असल्याचे उपोषणकर्त्यानी म्हटले आहे. सध्या गावोगावी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचे फलक झळकत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक; काय आहे प्रकरण?

- Advertisment -

ताज्या बातम्या