मुंबई | Mumbai
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ‘आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ. महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असे म्हणत ठाकरे बंधूंना आव्हान दिले होते. त्यानंतर काल (शुक्रवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मीरा भाईंदर येथे सभा पार पडली. यावेळी बोलतांना त्यांनी आपण कडवट मराठी आहोत हे दाखवून देत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी एक्सवर पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचले आहे. त्यांनी “मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली?, असे म्हणत एएनआयचा (ANI) व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे राज ठाकरेंनी विधानभवनाच्या (Vidhanbhavan) सभागृहात झालेल्या राड्यावर देखील काल सोशल मीडियावर (Socila Media) पोस्ट करत भाष्य केले होते.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
मीरा भाईंदर येथील आपल्या कालच्या सभेत राज ठाकरेंनी निशिकांत दुबे यांच्यावर टीका करतांना म्हटले होते की, “महाराष्ट्रात येऊन कोणीही मराठी व्यक्तीच्या अंगावर आला तर त्याला ठेचायचे. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही.
भारतीय जनता पक्षाचा दुबे नावाचा खासदार (MP) म्हणाला की, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु, त्याच्यावर केस झाली आहे का? हिंदी चॅनेलवाल्यांनी त्यांचे चालवले का? त्याचं विधान दाखवलं का? काहीही नाही. तुम्ही आम्हाला पटक पटकके मारणार असे म्हणतात. त्यांना मी सांगतो तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबून डुबून मारू. असे राज ठाकरेंनी म्हटले होते.





