Friday, April 17, 2026
HomeराजकीयMaharashtra News : सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपालपद सोडले; 'यांना' मिळाली जबाबदारी

Maharashtra News : सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपालपद सोडले; ‘यांना’ मिळाली जबाबदारी

मुंबई | Mumbai

एनडीएच्या वतीने सी.पी.राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) यांना उपराष्ट्रपतीपदाची (Vice President) उमेदवारी देण्यात आली होती. तर इंडिया आघाडीने (India Aaghadi) त्यांच्याविरोधात देशाचे माजी सरन्यायाधीश बी.सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisement -

सी.पी.राधाकृष्णन यांनी रेड्डी यांचा तब्बल १५२ मतांनी पराभव केला. राधाकृष्णन यांना ४५२ तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. ७८२ पैकी ७६७ खासदारांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Election) मतदानाचा हक्क बजावला होता. तर १५ मते हे अवैध ठरली होती. याशिवाय इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी क्रॉस वोटिंग देखील केले होते.

दरम्यान, यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सी.पी.राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडले आहे.त्यानंतर आता गुजरातच्या राज्यपालाकंडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे नवे राज्यपाल नियुक्त होईपर्यंत आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

आचार्य देवव्रत नेमके कोण आहेत?

आचार्य देवव्रत हे एक शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी असून, ते सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत.यापूर्वी २०१५ पासून ते २०१९ पर्यंत देवव्रत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर त्यांच्याकडे राज्यपाल (Governor) म्हणून गुजरातची जबाबदारी सोपवण्यात आली असून,आता महाराष्ट्राचा देखील पदभार सोपवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पुनर्रचनेत नगर जिल्ह्यात आणखी एक लोकसभा मतदारसंघ?

0
नवी दिल्ली | New Delhi केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत परिसीमनशी संबंधित दोन महत्त्वाची विधेयके सादर केली. यावेळी जागावाटपावरून होणारी चर्चा अधिक तीव्र झाली आहे, कारण...