नवी दिल्ली | New Delhi
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्याविरोधात काँग्रेसकडून (Congress) सलग चार दिवस दिल्लीत आंदोलन (Protest) करण्यात आले. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सुरुवातीला निवडणूक आयोगावर मोर्चा काढला परंतु, पोलीसांनी त्यांना रोखलं.त्यामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधींसह इतर नेत्यांनी दिल्लीतील आकाशवाणी भवन येथेच ठिय्या द्यावा लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुल गांधींसह (Rahul Gandhi) इतर खासदारांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यासह इतर खासदारांना २४ तासांत दुसऱ्यांदा ताब्यात घेण्यात आले.
यानंतर तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या खासदारांनी राजघाटावर (Rajghat) जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केले. त्यानंतर शुक्रवारी (दि.०९ ऑक्टोबर) रोजी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह इतर खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी केली. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरे, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, खासदार सुप्रिया सुळे आणि इतर नेते उपस्थित होते.
दरम्यान त्यानंतर आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर (Social Media Account) स्वत:च्या भाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यांनी कॅप्शनमध्ये “ज्ञानेश कुमार जातील, हे सरकार जाईल आणि त्यानंतर लोकशाहीला (Democracy) पुन्हा भक्कम करण्याचं काम सुरु होईल”, असे म्हटले आहे.
राहुल गांधीं व्हिडीओमध्ये काय म्हणाले?
व्हिडीओमधील भाषणात राहुल गांधींनी, “२०१४ मध्ये भारतात एक मोठा बदल झाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट भारतातील लोकांनी व्यक्त होणे असल्याचे मला लहानपणापासून शिकवण्यात आले. माझ्या आयुष्यात मला असं शिकवण्यात आलं की लोकांचा व्यक्त होण्याचा अधिकार आपण जपला पाहिजे. याच विचाराने मी राजकारणात आलो आहे. आम्ही पण निवडणुका पाहिल्या आहेत. आपण सर्वजण निवडणुका लढलो आहोत. आपण निवडणुका जिंकतो आणि पराभूत होतो. हीच लोकशाही आहे. लोकांची मतं बदलतात आणि हा बदल होतो. २०१४ नंतर हे बदलत गेले,” असं त्यांनी म्हटले आहे.
२०१४ नंतरच्या परिस्थितीवर बोलताना काय म्हटलं?
राहुल गांधी यांनी २०१४ नंतरच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की,”मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात हे झालं. मला याचा धक्का बसला. यावर प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. भारताच्या लोकशाहीचा नाश केला जात आहे का? असे मला आता वाटू लागले आहे. अनेकदा मला असं वाटायचं पण मी बोललो नव्हतो. मी जेव्हा काही ठराविक, १०० टक्के पुरावे समोर आणले तेव्हाच प्रश्न उपस्थित केले. लोकशाहीवर असेच प्रश्न विचारता येत नाही. मी वाट पाहिली आणि मी सारं काही पाहत होतो. आपल्याकडे असे अनेकजण आहेत ज्यांनी यावर हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये काम केले आहे. त्यांनीच मला यासंदर्भातील पुरावे आणून दिले. मतदार याद्यांमधून नावं काढली, वेगळी नावं टाकलं. हा आकडा लाखोंच्या संख्येने होते. त्यावेळी मला लोकशाही व्यवस्थेत अडचण असल्याचे जाणवले. लोकशाही व्यवस्थेत बिघाड झाला तर संविधान काम करणार नाही. असे झाले तर संसदेत तयार होणारा प्रत्येक कायदा हा बेकायदेशीर आहे. आपण हे कधी पाहिलेले नाही. मात्र आता या फेजमध्ये शिरलो असून,आपण प्रश्न विचारु लागलो आणि आता लोकांचा विश्वास बसत आहे,असं राहुल गांधींनी म्हणाले.



