नाशिक | Nashik
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) हे आज (रविवारी) नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येणार होते. मात्र, आता त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी दिली आहे. अजित पवार हे एका खाजगी कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर येणार होते.
माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर येणार होते. पंरतु, त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अजित पवारांचा नाशिक दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची (NCP Workers) दौऱ्याच्या तयारीची मेहनत वाया गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दरम्यान, अजित पवार आपल्या आजच्या (रविवार) नाशिक दौऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Election) दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासोबतच पक्ष बांधणीवर लक्ष देणार होते. त्यासाठी आज दुपारी १२.३० वाजता राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. मात्र, आता हा दौरा रद्द झाला आहे.