Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPolitical News : ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; सासरे पक्षाचे कट्टर समर्थक,...

Political News : ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; सासरे पक्षाचे कट्टर समर्थक, तर सुनेने केला भाजपमध्ये प्रवेश

मुंबई । Mumbai

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी (Mumbai NMC) मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबांचे निष्ठावंत मानले जाणारे विनोद घोसाळकर यांच्या स्नुषा आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांनी कमळ हाती घेतले.

- Advertisement -

तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांचे पती अभिषेक घोसाळकर यांचा एका गोळीबारात मृत्यू झाला होता. त्याआधी प्रभाग क्रमांक १ मधून अभिषेक घोसाळकर २०१२ ते २०१७ पर्यंत नगरसेवक होते. त्यांच्यानंतर तेजस्वी घोसाळकर २०१७ ते आतापर्यंत नगरसेविका होत्या. पंरतु, प्रभाग क्रमांक १ साठी आता ओबीसी (OBC) आरक्षण घोषित झाले आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक ७ किंवा ८ आणि संधी मिळाली तर प्रभाग क्रमांक २ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.

YouTube video player

भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी केली फेसुबक पोस्ट

तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी फेसुबक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, मी, तेजस्वी अभिषेक घोसाळकर, एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते; सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले. लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा आनंद मिळत गेला. सगळं काही छान सुरू असताना, अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर-बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्नं पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला.अभिषेकची निघृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे, असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक 1 असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन, असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Crime : गोल्ड डिलिव्हरीत दहा लाखांचा ‘झोल’; नामांकित सराफा उद्योगाकडून...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मुंबईतील नामांकित 'मलबार गोल्ड अँन्ड डायमंड' ने नाशिकमधील (Nashik) एका कुरिअर कार्यालयाकडे पाठविलेले दहा लाखांचे गोल्ड कॉइन 'डिलिव्हरी' दरम्यान संशयास्पदरित्या...