मुंबई | Mumbai
उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, विविध पक्षांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत (Mahapalika Election) उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे काहींनी बंडखोरी केली आहे तर काहींनी इतर पक्षांत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना फटका बसताना दिसत आहेत. आज (रविवारी)सकाळीच नाशिकमध्ये मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
हे देखील वाचा : BMC Election Manifesto : ठाकरे बंधूंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर; सत्ताधाऱ्यांवर बरसले, नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या शुभा राऊळ (Shubha Raul) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) सुपूर्द केला आहे. यानंतर त्यांनी मंत्री आशिष शेलार आणि आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. त्यामुळे त्या लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राऊळ यांनी राजीनामा का दिला? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हे देखील वाचा : Thackeray Brothers BMC Election Manifesto : ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात ‘या’ महत्वाच्या घोषणा; महायुतीसाठी ठरणार डोकेदुखी
दरम्यान, शुभा राऊळ या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोठ्या महिला नेत्या समजल्या जातात. मात्र, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी (Shivsena UBT) हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज (रविवारी) युतीचा वचननामा जाहीर केला असताना राऊळ यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.




