Monday, April 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजKunal Patil : विचार काँग्रेसचेच, दूरदृष्टी ठेवत निर्णय - भाजपा प्रवेशापूर्वी कुणाल...

Kunal Patil : विचार काँग्रेसचेच, दूरदृष्टी ठेवत निर्णय – भाजपा प्रवेशापूर्वी कुणाल पाटलांचे प्रतिपादन

मुंबई | धुळे | Mumbai | Dhule

माझ्या आजोबांपासून काँग्रेस (Congess) पक्षामध्ये मी आहे. आमचे विचार काँग्रेसचे आहेत, मात्र दूरदृष्टी ठेवून मी भाजप (BJP) पक्षात प्रवेश करत आहे. आपण काँग्रेस पक्षाशी ७० वर्षापासून एकनिष्ठ आहोत, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे अवघड असले तरी जड अंतकरणाने हा निर्णय घ्यावा लागत आहे. असे काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला आहे. उत्तर महाराष्ट्र (Uttar Maharashtra) खरंतर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र याच उत्तर महाराष्ट्राकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले आहे. अगदी इंदिरा गांधी (Indira Gandhi) सुद्धा महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करायच्या मात्र आता हा भाग दुर्लक्षित झाल्याचे कुणाल पाटील म्हणाले.

काँग्रेसमध्ये असताना मी माझे काम चोखपणे पार पाडले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर विचारात घेऊन मी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे कुणाल पाटील म्हणाले. आपण काँग्रेस पक्षाशी ७० वर्षापासून एकनिष्ठ आहोत, आता त्या पक्षातून (Party) दुसऱ्या पक्षात जाणे अवघड असते. मात्र आपल्या भागात विकास होण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.

लहानपणापासूनच काँग्रेस हा आपला पक्ष

लहानपणापासून पाहिले की काँग्रेस हा आपला पक्ष आहे आणि काँग्रेसशीच आपण एकनिष्ठ राहायचे. आपल्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. अशा प्रकारची भावना घेऊनच आम्ही लहानचे मोठे झालो. माझे आजोबा पंडीत नेहरू यांच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले खासदार होते. आमच्या वडिलांनी ती ख्याती पुढे चालू ठेवली. तेही ७ वेळा आमदार (MLA) झाले होते. मी पण २०१४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढलो. फार मोठ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिले. २०१९ मध्येही लोकांनी माझी साथ दिल्याचे कुणाल पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...