Wednesday, February 4, 2026
Homeमुख्य बातम्याManikrao Kokate : अडचणीत सापडलेल्या नेत्यासाठी समर्थक मैदानात; मात्र कोकाटे म्हणतात "अजित...

Manikrao Kokate : अडचणीत सापडलेल्या नेत्यासाठी समर्थक मैदानात; मात्र कोकाटे म्हणतात “अजित पवारांवर माझा विश्वास”, नेमकं काय घडलं?

नाशिक | Nashik

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाईन रमी (Rummy) खेळताना व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोकाटे यांच्याबाबत सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. यामध्ये कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी निश्चित मानली जात आहे.

- Advertisement -

दुसरीकडे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या सिन्नर मतदारसंघातील जनतेने त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. आज (शनिवारी) सिन्नरमध्ये कोकाटे यांचे समर्थक शक्तिप्रदर्शन करणार होते. सिन्नर बसस्थानकावर एकवटण्याचे आवाहन कोकाटे समर्थकांकडून करण्यात आले होते. मात्र कोकाटे यांनी समजूत काढल्यानंतर समर्थकांनी स्वतहून बोलवलेला हा मेळावा रद्द केला आहे.

YouTube video player

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी समर्थकांना शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. अजित पवारांवर माझा विश्वास आहे असे म्हणत त्यांनी समर्थकांना शांत केले. यावेळी ते म्हणाले की, “माझ्या खात्यात (Account) एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार नाही. शिवाय राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे खाते म्हणून माझ्या विभागाचे काम आहे. शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही अजित पवारांवर माझा विश्वास आहे. असे म्हणत त्यांनी समर्थकांची समजूत काढली .त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ होणारे आंदोलन रद्द करण्यात आले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे माणिकराव कोकाटे यांचे सभागृहातील कृत्य आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हणणे यावरून नाराज असल्याची चर्चा आहे. तर कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवावे किंवा नाही याबाबत राष्ट्रवादीमध्ये (NCP) दोन मतप्रवाह असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार कोकाटे यांच्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...