नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
पावसाळा संपला की राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व इतर निवडणुकींचे (Election) वारे सुरू होतील. या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढविणार व सर्व ठिकाणी महायुतीच विधानसभा निवडणुकीप्रमाणे विजयी होईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला. येथील महसूल आयुक्त कार्यालयात मंत्री बावनकुळे हे आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली
यावेळी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, “आता निवडणूक कोणालाही पुढे ढकलता येणार नाही. पावसाळा संपला की निवडणुकीचे वारे सुरू होतील व सर्व निवडणुका होतील. विधानसभेसारखाच (Vidhansabha) रणसंग्राम महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल. या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढविणार आहोत. तसेच सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचे महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून येतील”, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, “पालकमंत्रीबाबत (Gradian Minister) लवकरच निर्णय होईल. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात चर्चा सुरू असून, सदरची चर्चा अंतिम टप्प्यात आहे व त्याबाबत योग्य निर्णय होईल. त्याप्रमाणेच मुंबईत (Mumbai) आमचे मोठ्या प्रमाणात काम आहे त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल. तर शिवसेना ठाकरे गट व मनसे या दोन पक्षात युती संदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री बावनकुळे म्हणाले की, ते प्रगल्भ नेते असून, योग्य ते निर्णय घेतील. मला त्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, असे त्यांनी म्हटले.
तसेच “पुणे येथे झालेल्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) आत्महत्या प्रकरणी (Suicide Case) बोलतांना मंत्री बावनकुळे म्हणाले की, “झालेला प्रकार गंभीर असून, अशा घटना घडणे योग्य नाही. आरोपींना कडक शासन होईल तसेच याबाबत सरकारने सुद्धा गंभीर दखल घेतली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना लवकरच नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय होईल. तर बऱ्यापैकी पंचनामे झाले असून, ते सुद्धा लवकर पूर्ण होतील”, असेही मंत्री बावनकुळे यांनी म्हटले.