मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘महाराष्ट्र हितापेक्षा कोणी मोठं नाही’, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्याची साद घातली होती. यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्याला तात्काळ प्रतिसाद दिला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरुन विविध चर्चा सुरु आहेत. तसेच या संभाव्य युतीवरून (Allince) मनसेच्या नेत्यांकडून ठाकरे गटावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट परदेशातून मनसेच्या नेत्यांना निरोप पाठवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत कोणतेही भाष्य न करण्याचे आदेश दिले आहेत. युतीचा विषय संवेदनशील असल्याने या प्रश्नाबाबत २९ एप्रिलपर्यंत कुणीही बोलू नका. आपण स्वत: मुंबईत आल्यावर यावर भाष्य करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मनसे नेत्यांना राज ठाकरे परदेशातून परतल्यानंतर ठाकरे गटासोबत () होणाऱ्या युतीवर भाष्य करता येणार आहे.
.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वागत केले आहे.तर मनसेच्या नेत्यांनी (MNS Leader) युती करायला नको, असे मत व्यक्त केले आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी’अभद्र युती होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना’ असं ट्विट कले होते. तसेच मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मनसैनिकांवर गुन्हे (Case) दाखल केल्याने उद्धव ठाकरे माफी मागणार का?, असा सवाल उपस्थित केला होता.