मुंबई | Mumbai
राज्यातील पुणे, सातारा, सांगली,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा (Zilla Parishad and Panchayat Samiti) निकाल आज (सोमवारी) जाहीर झाला. शनिवारी (दि. ०७) रोजी १२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी एकूण २५ हजार मतदान केंद्रांवर मतदान पार पडले होते. या निवडणुकीसाठी ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. तर राज्यभरात एकूण ६६.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली होती. तसेच कोकणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीच्या २७ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.
हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीच्या २७ जागा बिनविरोध
त्यानंतर आज निकाल (Result) जाहीर झाला असून, यात राज्यातील सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने (BJP) सर्वाधिक जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. तर महायुतीतील (Mahayuti) शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही काही ठिकाणी यश मिळाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही फार चांगला कामगिरी करता आलेली नाही. मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सांगली महापालिका जिंकली आहे. त्याव्यतिरिक्त इतर कुठेही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना सत्ता मिळवता आली नाही.
हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : सोशल मीडियावर ‘पॉवर’ फुल पण निवडणुकीत ‘हवा’ गुल; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारले
१२ जिल्हा परिषदांचा निकाल खालीलप्रमाणे
१) पुणे जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ७३
भाजपा – १०, शिंदेसेना – ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४८, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १, ठाकरे सेना – ०६, काँग्रेस – ०
२) सातारा जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ६५
भाजपा – २३, शिंदेसेना – १३, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ३३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १, ठाकरे सेना -०, काँग्रेस – ० इतर – ०
३) सांगली जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ६१
भाजपा – १७, शिंदेसेना – ०६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ०५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १७, ठाकरे सेना – ०१, काँग्रेस – ११ इतर – ०२
४) रायगड जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ५९
भाजपा – ०६, शिंदेसेना – २६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०, ठाकरे सेना – ०३, काँग्रेस – ०
५) रत्नागिरी जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ५६
भाजपा – ०४, शिंदेसेना – ४०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ०५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०, ठाकरे सेना – ०६, काँग्रेस – ०
६) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ५०
भाजपा – २७, शिंदे सेना – १४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०, ठाकरे सेना – ०३, काँग्रेस – ० इतर – ०६
७) कोल्हापूर जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ६८
भाजपा – १२ , शिंदे सेना – ०८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – २०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०, ठाकरे सेना -०१, काँग्रेस – १५, जनसुराज्य पक्ष – ०५, स्वाभिमानी शेतकरी संघटना – ०१, शाहू आघाडी (राजेंद्र पाटील यड्रावकर गट) – ०४
८) सोलापूर जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ६८
भाजपा -४२, शिंदे सेना – ०७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ०९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०, ठाकरे सेना -०, काँग्रेस – ०१, इतर – ०१
९) छ. संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ६३
भाजपा -२३, शिंदे सेना – २०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ०४, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०१, ठाकरे सेना – ०९, काँग्रेस – ०१, इतर – ०५
१०) परभणी जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ५४
भाजपा -२३, शिंदे सेना – ०५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १४, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०, ठाकरे सेना – ०६, काँग्रेस – ०३, इतर – ०३
११) धाराशिव जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ५५
भाजपा -१६, शिंदे सेना – १५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ०५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०, ठाकरे सेना – ०७, काँग्रेस – ०३, इतर – ०५
१२) लातूर जिल्हा परिषद निकाल – एकूण जागा ५९
भाजपा – १८, शिंदे सेना – ०१, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १२, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०१, ठाकरे सेना -०१, काँग्रेस – २३, इतर – ०३





