मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती डॉ.प्रांजल खेवलकर (Dr. Pranjal Khewalkar) हे पुण्यातील (Pune) उच्चभ्रू खराडी भागातील स्टे बर्ड गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सापडले आहेत.
पोलिसांनी (Police) या प्रकरणामध्ये डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, रा. हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, माळवाडी), समीर फकीर सय्यद (वय ४१, एनआयबीएम रस्ता), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, वाघोली), श्रीपाद मोहन यादव (वय २७, आकुर्डी), ईशा देवज्योत सिंग (वय २२, औंध), प्राची गोपाल शर्मा (वय २३, म्हाळुंगे) यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली आहे.
या प्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता २४ तासांनी रोहिणी खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन ओळीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वेळ हेच उत्तर असते. योग्य वेळी सत्य बाहेर येईलच, असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर हे ट्विट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकरसह सातही जणांना न्यायालयाने (Court) दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.खेवलकर यांनी चार दिवसांसाठी एक फ्लॅट बुक केला होता. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) शुक्रवार (दि.२५ जुलै) रोजी झालेल्या पार्टीची देखील चौकशी करणार आहेत. त्यासाठी ज्या फ्लॅटमधे पार्टी झाली तेथील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाणार आहेत.
कारवाईत पोलिसांना काय-काय सापडलं?
खराडीतील स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमधील खोली क्रमांक १०२ मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. यात आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा, १० मोबाइल, दोन कार, हुक्का पॉट आणि दारू, मोबाइल आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण ४१ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




