Saturday, January 24, 2026
HomeराजकीयSharad Pawar : "आतापर्यंतचा माझा अनुभव..."; ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात शरद पवार स्पष्टच...

Sharad Pawar : “आतापर्यंतचा माझा अनुभव…”; ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात शरद पवार स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai 

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडूनही वारंवार उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरेंच्या संभाव्य युतीसंदर्भात भाष्य करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

- Advertisement -

यावेळी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “आता पर्यंतचा माझा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभाना गर्दी होते मात्र त्यांना मतं मिळत नाहीत”, असे म्हणत त्यांनी राज यांना टोला लगावला. दुसरीकडे त्याचवेळेस शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “राज यांच्या तुलनेत उद्धव यांना मतांमध्ये परिवर्तन करण्यात अधी यश येते”, असे विधान त्यांनी केले.

YouTube video player

मविआने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढाव्यात

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातही (Local Body Election) आपली इच्छा पत्रकारांसमोर बोलून दाखवली. ते म्हणाले की, “माझी अशी इच्छा आहे की, महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र लढाव्यात”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

Sangamner : अवैध कत्तलखान्यावर ‘एलसीबी’चा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरातील अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शुक्रवारी (दि.23) महिन्याभरात चौथी मोठी कारवाई केली आहे. गोवंश जनावारांचे कत्तल...