Monday, September 7, 2026
Homeदेश विदेशSharad Pawar Meet PM Modi : शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट;...

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित, काय चर्चा झाली?

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

दिल्लीमध्ये सध्या नीट पेपरफुटीवरून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते. या भेटीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) या भेटीचे चार फोटो शेअर करत माहिती दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या बैठकीत शरद पवार यांनी दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सविस्तर माहिती आणि त्याबाबतची सद्यस्थिती पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मांडल्याचे समजते. तसेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील विविध मुद्द्यांवरही या वेळी चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद

पंतप्रधान मोदींसोबतच्या या बैठकीनंतर शरद पवार हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत. या पत्रकार परिषदेत शरद पवार स्वतः या भेटीचा (Meet) मुख्य उद्देश आणि झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

एनडीए सहभागाच्या चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचा पक्ष एनडीए (NDA) आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय गोटात रंगत आहेत. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या सत्तेत पवारांच्या पक्षाला वाटा मिळू शकतो, अशीही चर्चा आहे. या अंतर्गत जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेदेखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर, आता शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट आगामी राजकीय समीकरणांचे नवे संकेत तर देत नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...