Monday, June 9, 2025
HomeराजकीयPolitical News : ठाकरेंचा 'पैलवान' शिंदेंच्या तालमीत; आज करणार शिवसेनेत प्रवेश

Political News : ठाकरेंचा ‘पैलवान’ शिंदेंच्या तालमीत; आज करणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण आणि कुस्ती ही दोन्ही मैदाने गाजवलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil)  हे पक्षांतर करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (सोमवारी) उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पाटील शिवसेनेत अधिकृत प्रवेश (Join) करणार आहेत.

याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली आहे. चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Loksabha) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. आता चंद्रहार पाटील यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरोबर एका वर्षाने चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

दरम्यान, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलतांना महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोमवारी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असे चॅलेंज ठाकरेंच्या शिवसेनेला दिले होते. त्यानंतर चंद्रहार पाटील यांनी मी अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच असून पक्ष सोडण्याबाबत अजून निर्णय घेतला नाही. शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे, असे म्हटले होते. यानंतर आता चंद्रहार पाटील आज ‘मशाल’ सोडून ‘धनुष्यबाण’ हातात घेणार आहेत.

चंद्रहार पाटील यांनी पोस्टमध्ये काय म्हंटलय?

राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : दरोड्याचा कट फसला; पाच जण जेरबंद

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik  दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा तडीपारांसह तिघा सराईतांना उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) पाठलाग करुन गजाआड केले आहे. जेलरोड (Jail...