Monday, October 12, 2026
Homeमुख्य बातम्याIndia Alliance Morcha : सर्वोच्च न्यायालयावर 'इंडिया' आघाडीचा मोर्चा; मल्लिकार्जुन खर्गे, राहुल...

India Alliance Morcha : सर्वोच्च न्यायालयावर ‘इंडिया’ आघाडीचा मोर्चा; मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधींकडून रिट याचिका दाखल

नवी दिल्ली | New Delhi

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार, ‘एसआयआर’ (SIR) आणि मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांविरोधात ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीत कॅनॉट प्लेस ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जोरदार धडक मोर्चा काढला. विरोधी पक्षांच्या अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम देत राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रियांका गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे, ममता बॅनर्जी आणि ‘आयसा’च्या नेत्या नेहा बोरा यांच्यासह अनेक प्रमुख नेते या आंदोलनात (Protest) एकजुटीने सहभागी झाले.

- Advertisement -

सरन्यायाधीशांकडून भेटीची मागणी अमान्य

विरोधी पक्षांच्या खासदारांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्याकडे भेट घेऊन निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, प्रशासकीय स्तरावर भेट देण्यास नकार देत सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, “सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे प्रत्येक सामान्य नागरिकासाठी आणि लोकप्रतिनिधीसाठी उघडे आहेत. न्यायालय कायदेशीर प्रक्रियेनुसार सर्वांच्या चिंता ऐकून घेईल, असे म्हटले.

रिट याचिका दाखल

या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेआणि राहुल गांधी यांनी न्यायालयाचे काउंटर बंद होण्याच्या काही वेळ आधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरोधात ‘राहुल गांधी विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग’ या शीर्षकाखाली रिट याचिका दाखल केली. काँग्रेसच्या १० ते १५ नेत्यांच्या शिष्टमंडळाला याचिका दाखल करण्याच्या काउंटरपर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि राहुल गांधींना रोखले

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीचा मोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने निघाला होता. सुरुवातीला राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ‘आयसा’च्या नेत्या नेहा बोरा हजारो कार्यकर्त्यांसोबत पायी चालत पुढे जात होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी वाटेतच त्यांना रोखून धरले.

दोनशे सरकारी अधिकारी संपर्कात असल्याचा राहुल गांधींचा दावा

या आंदोलनापूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, सक्तीच्या कारवाईचा बडगा उगारणाऱ्या ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि परराष्ट्र मंत्रालयातील सुमारे २०० सरकारी अधिकारी सध्या विरोधकांच्या थेट संपर्कात आहेत आणि सरकारची अंतर्गत माहिती शेअर करत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या दबावाखाली काम करत असून सरकार बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला.

लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील – अखिलेश यादव

मोर्चादरम्यान पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी या आंदोलनाला ‘शिव तांडवा’ची उपमा दिली. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, “भाजप निवडणूक आयोगाच्या संगनमताने बनावट मतदार याद्या आणि बनावट मतदानाच्या आधारे संविधान व लोकशाही नष्ट करू पाहत आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आमचा हा संघर्ष आणि आंदोलने पुढेही सुरूच राहतील, असे म्हटले.

आप खासदार संजय सिंह यांचे पंतप्रधानांना पत्र

दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ‘एसआयआर’च्या नावाखाली देशातील १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत, या ‘मतचोरी’वर आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर झालेल्या कारवाईवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन (Special Session) तातडीने बोलावण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : महाविकास आघाडीचा ‘या’ तारखेला नाशकात भव्य मोर्चा; कोणते...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राज्यातील सद्यस्थिती, जनतेचे प्रलंबित प्रश्न आणि सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) वतीने येत्या २४ ऑक्टोबर रोजी महामोर्च्याच्या पूर्वतयारीसाठी आज...