Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजप्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाआधीच मोठा ट्विस्ट; उध्दव ठाकरेंचा फोन, दोन्ही नेत्यांमध्ये काय...

प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाआधीच मोठा ट्विस्ट; उध्दव ठाकरेंचा फोन, दोन्ही नेत्यांमध्ये काय झाली चर्चा?

पुणे | Pune
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये नेते पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश आणि राजीनामा सत्र सुरु असतानाच पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही याचा मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे आणि पिपंरी-चिंचवडमध्ये एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढण्याची तयारी असतानाच या निर्णयावर नाराज होऊन शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आज काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असल्याची चर्चा असतानाच पुन्हा मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे आज दुपारी १२ वाजता मुंबईत काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत जगतापांचा पक्षप्रवेश होणार आहे, दुपारी १२ वाजता टिळक भवनला पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील प्रशांत जगताप यांना ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना फोन केला होता. काल (गुरूवारी ता २५) रात्री उशिरा ९ मिनिट दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेत या तुमचा योग्य सन्मान राखू. आम्ही भाजपा सोबत कदापी जाणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांची प्रशांत जगताप यांना ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.

पुढील दोन-तीन तासांमध्ये निर्णय घेईन
मी उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याशी बोलायला त्यांनी वेळ दिला. या राज्यातील आक्रमक चेहरा आणि भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेला नेता माझ्याशी फोनवर बोलला. त्यांनी माझ्या भावना समजवून घेतल्या. तुम्ही आमच्या पक्षात काम करु शकता, असे त्यांनी सांगितले. मी भाजप किंवा महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये कुठेही जाणार नाही. आज मी माझ्या राजकीय जीवनाचा योग्य तो निर्णय घेईन. पण मी उद्धव साहेबांचा कायम ऋणी राहीन. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची योग्यता समजून घेतली. पण पुढील दोन-तीन तासांमध्ये माझा निर्णय होईल.

उध्दव ठाकरेंचा ऋणी राहील
तसेच मी भाजपा किंवा ज्या महायुतीमुळे राज्याचे वाटोळे झाले आहे त्या तिन्ही पक्षात कुठेही जाणार नाही. आज मी राजकीय भविष्याबाबत निर्णय घेणार आहे. मी उद्धव ठाकरेंचा ऋणी राहील, त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची दखल घेतली. पुढच्या २ ते ३ तासांत मी राजकीय निर्णय घेईन. माझी लढाई संविधानासाठी आणि पुरोगामी चळवळीकरता आहे. ती कुठल्या एका पक्षाच्या, नेत्याच्या आणि व्यक्तीविरोधात नाही. आज भाजपा सरकारला आव्हान देऊ शकता अशा पक्षाची निवड मी नक्की करेन असंही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

ही माझ्या आयुष्यातील कायमस्वरुपी आठवण आहे
दरम्यान, भाजपचा कडवा विरोधक म्हणून उद्धव साहेबांची ओळख राज्यात आणि देशात आहे. कारण त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह, त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते भाजपने ज्या पद्धतीने पळवले आणि त्यांच्याच विरोधात उभे केले, अशा परिस्थितीत खचून न जाता तडजोड न करता उद्धव ठाकरे ज्याप्रकारे लढत आहेत, ही उल्लेखनीय बाब आहे. त्यांच्याकडे इतका जनमताचा रेटा आहे त्या नेत्याने माझ्यासारख्याशी फोनवर साडेनऊ मिनिटांची वेळ देणे, ही माझ्या आयुष्यातील कायमस्वरुपी आठवण आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. पुण्याच्या भल्यासाठी तुम्ही आमच्यासोबत काम करु शकता, असे उद्धव साहेबांनी सांगितले. ही माझ्यासाठी गोष्ट आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एएसपी कलुबर्मे यांच्यासह 10 जणांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राज्यातील 800 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन महाराष्ट्र दिनी गौरविण्यात येणार आहे....