Wednesday, September 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाका -...

Uddhav Thackeray : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाका – उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) कारभाराबाबत ‘द इंडियन एक्सप्रेस’वृत्तपत्राने केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या एकतर्फी व मनमानी कारभाराविरोधात कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

- Advertisement -

यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तत्काळ अटक करून कोठडीत टाकावे, तसेच महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू आणि दिल्लीतील निवडणुका रद्द करून पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.

ज्ञानेश कुमार यांना तातडीने तुरुंगात टाका

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “लोकशाहीचा खून करणाऱ्या आणि एकाधिकारशाही चालवणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा विद्रूप चेहरा आज देशासमोर आला आहे. त्यांची जागा तुरुंगातच आहे, त्यांना तातडीने अटक (Arrested) करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

निवडणुका रद्द करून बॅलेट पेपरवर घ्या

पुढे ते म्हणाले, “निवडणूक आयुक्तांच्या (Chief Election Commissioner) मनमानी कारभारामुळे झालेल्या सर्व निवडणुकांवर संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुका रद्द करून आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घेण्यात याव्यात. सुखबीर संधू आणि विवेक जोशी यांनी जे आक्षेप नोंदवून तक्रार करण्याचे धाडस दाखवले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. निवडणूक आयोगात एकवाक्यता नसून तिथे टोळीप्रमाणे काम चालले आहे,” असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

शिवसेना व राष्ट्रवादी फोडण्याचा कट

पुढे ते म्हणाले की, “ज्ञानेश कुमार यांनी पहिला आघात शिवसेनेवर (Shivsena) केला व आमचे चिन्ह गद्दारांना दिले. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर (NCP) आणि आता तृणमूल काँग्रेसवरही तीच वेळ आणली जात आहे. गृह खातेच निवडणूक आयोग चालवत असून यामागील खरा सूत्रधार समोर आला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच देशातील सर्व विरोधी पक्षांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून बॅलेट पेपरच्या मुद्द्यावर एकत्र यावे आणि जनतेनेही आता रस्त्यावर उतरून लोकशाही वाचवण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेसचीही दिल्ली, हरियाणाच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी

दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसनेही (Congress) दिल्लीत (Delhi) पत्रकार परिषद घेऊन तीव्र विरोध दर्शवला आहे. दिल्ली आणि हरियाणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुका रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काय आहे ‘द इंडियन एक्सप्रेस’चा गौप्यस्फोट?

निवडणूक आयोगाचे दोन्ही सदस्य (सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी) यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांवर तीव्र आक्षेप नोंदवले होते. आपल्याला विश्वासात न घेता व नियमांचे उल्लंघन करून परस्पर निर्णय घेतले जात असल्याची तक्रार या दोन्ही आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे लेखी पत्राद्वारे केल्याचे या अहवालात (Reports) नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

सर्व निर्णय सर्वसंमतीनेच झाले, मतभेद असणे…; टीकेची झोड उठताच निवडणूक आयोगाचे...

0
दिल्ली । Delhi देशातील सार्वत्रिक व विधानसभा निवडणुकांच्या पारदर्शकतेवरून नेहमीच विरोधी पक्षांच्या निशाण्यावर असणारा भारताचा निवडणूक आयोग (Election Commission of India) आता एका नव्या आणि...