Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजKerala CM Oath : केरळच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशन यांनी घेतली शपथ;...

Kerala CM Oath : केरळच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशन यांनी घेतली शपथ; महाराष्ट्राशी कनेक्शन असलेल्या ‘या’ नेत्याची मंत्रिपदी वर्णी

नवी दिल्ली | New Delhi

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) केरळमध्ये तब्बल दहा वर्षांनी सत्ता मिळवली. निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रि‍पदाचा (CM Post) पेच निर्माण झाला होता. अखेर दहा दिवसांनी हा पेच सुटला. एका आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या सखोल विचारमंथनानंतर केरळ काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून व्ही डी सतीशन (V. D. Satheesan ) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज (सोमवारी) त्यांनी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

व्ही. डी. सतीशन यांनी आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सतीशन यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर वीस मंत्र्यांनीही पदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी हे देखील उपस्थित होते. तसेच काँग्रेसच्या विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

दरम्यान, व्ही. डी. सतीशन यांच्या मंत्रिमंडळात (Cabinet) नव्या १४ आमदारांनी प्रथमच मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये सी.पी. जॉन, एन. शमसुद्दीन, के.एम. शाजी, पी.के. बशीर, व्ही.ई. अब्दुल गफूर, पी.सी. विष्णुनाथ, रोजी एम. जॉन, बिंदू कृष्णा, टी. सिद्दीकी, के.ए. थुलसी आणि ओ.जे. जनीश यांचा समावेश आहे. तर विधानसभा अध्यक्षपदी तिरुवनचूर राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी शनिमोल उस्मान यांची निवड करण्यात आली आहे.

रमेश चेन्निथला यांची मंत्रिपदी वर्णी

केरळच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) हे देखील शर्यतीत होते. मात्र, मुख्यमंत्रि‍पदाकरिता व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने ते नाराज झाले होते. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न पक्षाकडून करण्यात आले. यानंतर त्यांना केरळच्या मंत्रीपदी संधी देण्यात आली. आज चेन्निथला यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांना कुठले खाते मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

ताज्या बातम्या

Sonai : 22 लाख रूपयांचा बनावट खतांचा साठा जप्त

0
सोनई |वार्ताहर| Sonai शिंगवे तुकाई एमआयडीसी येथे कृषी विभागाच्या वतीने छापा टाकून 21 लाख 80 हजार रुपयांच्या रासायनिक खताच्या पॅकिंग केलेल्या 2 हजार 34गोण्या विक्री...