Friday, August 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPolitical News : शिंदे सेनेच्या उल्लेखावरून विधानसभेत खडाखडी; देसाई आणि सरदेसाई यांच्यात...

Political News : शिंदे सेनेच्या उल्लेखावरून विधानसभेत खडाखडी; देसाई आणि सरदेसाई यांच्यात रंगले वाकयुद्ध

नागपूर | प्रतिनिधी | Nagpur

साडेतीन वर्षांपूर्वी उभी फूट पडल्याने शिवसेनेचे (Shivsena) दोन गट झाले आहेत. त्यापैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिंदे गट असे सर्रासपणे संबोधले जाते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई (MLA Varun Sardesai) यांनी शनिवारी विधानसभेत वांद्रे सहकारी वसाहतीबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित करताना शिवसेना शिंदे गट असा दोनदा उल्लेख केला. या उल्लेखाला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यावरून देसाई आणि सरदेसाई यांच्यात काही काळ खडाखडी झाली.

- Advertisement -

वांद्रे येथील शासकीय कर्मचारी  वसाहतीला त्याच ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने नेमलेल्या समितीत भाजपच्या  दोन पदाधिकाऱ्यांचा आणि शिंदे गटाच्या माजी आमदाराचा समावेश करण्यात आला आहे. मात्र,या समितीत  त्या भागातील विद्यमान आमदार (MLA) म्हणून आपला समावेश करण्यात आला नाही, याकडे  सरदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे लक्ष वेधले.

सरदेसाई यांनी शिवसेना शिंदे गट असा उल्लेख केल्याने शंभूराज देसाई यांनी त्याला हरकत घेतली. भारत निवडणूक आयोगाने आम्हाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे नाव अधिकृतपणे दिले आहे.आमच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे, तुमच्या पक्षासारखे उबाठा नाही. त्यामुळे सरदेसाई यांनी केलेला शिवसेना शिंदे गट हा उल्लेख काढून टाकावा, अशी मागणी देसाई यांनी केली. त्यावर सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच शिंदे सेना असा चारवेळा तुमचा उल्लेख केल्याचे देसाई यांच्या निदर्शनास आणले.

वांद्रे शासकीय वसाहतीला जमीन उपलब्ध करून देण्याबाबत गठित करण्यात आलेल्या समितीत वरूण सरदेसाई यांचा समावेश काय जाईल. शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना जमीन देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी झालेल्या चर्चेच्या उत्तरात दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मृत व बोटांचे ठसे न उमटणार्‍या साडेतीन हजार कर्जदारांना...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील मृत शेतकरी खातेदारांच्या वारसांना लाभ दिला जाणार आहे. याबरोबरच कर्जमुक्तीचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत...