मुंबई | Mumbai
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकाळच्या सत्रात मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने अनेक लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ आली. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. अध्यक्ष महोदय, यांना जनाची नाही, मनाची तरी काही आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.
तुम्ही मंत्रिपदासाठी पुढे पुढे करता. आम्हाला मंत्री करा, यासाठी मागे लागता. परंतु, मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा पाळत नाही, तुम्हाला नेमून दिलेलं वैधानिक काम करत नाही. अध्यक्षसाहेब हे अत्यंत गलिच्छपणाचे कामकाज चालले आहे. गैरहजर मंत्र्यांपैकी कोणालाही विधिमंडळाच्या कामकाजात रस नाही. यांना बाकीच्याच कामांमध्ये रस आहे. पण त्यांनी सभागृहातील कामाला महत्त्व देण्याची गरज आहे. आम्हाला बोलण्याची वेळ का येते? निर्ल्लजपणाचा कळस गाठला गेला की आमचाही नाईलाज होतो, अशा कठोर शब्दांत अजित पवार यांनी मंत्र्यांना फैलावर घेतले.
श्रीगोंद्यातील अरणगाव दुमाला येथे सशस्त्र दरोडा, हल्ल्यात एकाचा मृत्यू
चंद्रकांत पाटलांवर माझा वैयक्तिक राग नाही. पण सभागृहात बसा ना येऊन जरा. सकाळी कामकाज चालू असताना ६ मंत्री गैरहजर होते. यांना जनाची नाही, मनाची काही आहे की नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला. चंद्रकांत पाटील रात्री २-२.३० वाजेपर्यंत जागत नाहीत. त्यांना लवकर येऊन बसायला काय हरकत आहे? संसदीय कामकाज मंत्र्यांना जर जमत नसेल, तर त्यांनी थांबायला हवं. मंत्री सभागृहात नसल्यामुळे ७ वक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली. हे अतिशय गलिच्छ कामकाज चाललं आहे. यांना कुणालाही विधिमंडळाच्या कामकाजात रस नाही. यांना बाकीच्याच कामात रस आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्याचं कामकाज चाललं आहे. अशा शब्दात अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
धक्कादायक! शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ Video व्हायरल
अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना आम्ही अध्यक्षांना रात्री येऊन विनंती केली की १० वाजेपर्यंत चर्चा घ्या. अध्यक्षांनी लगेच ही मागणी मान्य केली. ही चर्चा १० वाजेपर्यंत नाही, तर १ वाजून ३ मिनिटापर्यंत काम चाललं. त्यात अध्यक्षांचं सहकार्य मिळालं. ती चर्चा सुरू असताना काहीवेळा मंत्री हजर नव्हते. ते बाहेर जात होते. एखादा मंत्री बाहेर गेला तर सभागृह लगेच थांबवावं लागतं, तरीही ते वॉशरुमला, पाणी प्यायला, चहा घ्यायला गेले असतील असं म्हणत समजून घेतलं. आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा सकाळी ९ वाजता इथं येऊन बसायचो. मी माझी फुशारकी सांगत नाही. परंतु, आम्हीही गेली ३०-३२ वर्षे या सभागृहाची परंपरा कशी चालत आली आहे ते पाहतो. आमच्यानंतरही बाकीच्यांनी ही परंपरा राखली पाहिजे. महाराष्ट्र या विधिमंडळाकडे पाहत असतो, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
विधानभवनाच्या बाहेरच नितेश राणे आणि अबू आझमी भिडले, पाहा VIDEO
अजित पवार यांच्या या संतापावर उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली. विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलेली बाब गंभीर आहे. चंद्रकांत पाटील काल रात्री १ वाजता घरी आले. त्यामुळे विलंब झाला. आम्ही मंत्र्यांना समज देऊ, अशी सारवासारव फडणवीसांनी केली.
गोदावरीत चार तरुण बुडाले; एकाचा मृतदेह हाती, तिघांचा शोध सुरु
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा अजित पवारांच्या या मुद्द्यावर प्रकाश टाकला. मंत्र्यांनी सभागृहात वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे. सरकारने सुद्धा याची खबरदारी घ्यावी.2 हजार 376 लक्षवेधी ऑनलाईन आल्या आहेत. आपण गेल्या सहा दिवसात 57 लक्षवेधी चर्चा केली आहे. नियमानुसार तीन लक्षवेधी घेतल्या जातात पण आपण जास्त लक्षवेधी घेतो. यापुढे जास्तीत जास्त लक्षवेधी घेऊ, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांना दिलं.