Sunday, September 22, 2024
Homeराजकीयअजित पवारांचे 'त्या' विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले...

अजित पवारांचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात (winter session) छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली होती. यानंतर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आपली भूमिका मांडली…

यावेळी ते म्हणाले की, संभाजीराजेंना स्वराज्यरक्षक म्हणावे ही माझी भूमिका आहे. संभाजीराजेंबद्दल मी काही चुकीचे बोललो नाही. महाराजांचा मी कुठेही अपमान केला नाही. उलट महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल (Governor) मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केले आहे. त्या भाजप आमदारांवर (MLA) कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित केला. तसेच भाजपने (BJP) त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले असा आरोपही अजित पवारांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, स्वराज्यरक्षक ही उपाधी सर्वसमावेशक आहे. काही जण संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतात, काही जन स्वतः धर्मवीर लावतात. काहींचे चित्रपट निघाले, भाग दोन पण येणार आहे, असा म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. तसेच माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधी पक्षनेते हे पद राष्ट्रवादीने (NCP) दिलेले आहे, असेही पवारांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या