Friday, October 18, 2024
HomeराजकीयPolitical Special : नाशकात मिसळ पार्ट्यांचा जोर

Political Special : नाशकात मिसळ पार्ट्यांचा जोर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तप्त

नाशिक | फारूक पठाण | Nashik

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांसह (Political Party Leader) इच्छुकांनी विविध प्रकारे लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी मिसळ पार्ट्या (Misal Party) हे चांगले माध्यम असल्याचे दिसून येत आहे. सध्या राजकीय मिसळ पार्ट्यांची जोरदार चर्चा रंगत आहे. मिसळ पार्टीतून नवीन व जुन्या लोकांना जवळ करण्याचा पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : ‘होम अरेस्ट’ला अटकाव; मोबाईलमध्ये फीचर

सुमारे दोन महिन्यांपासून नाशकात (Nashik) मिसळ पार्ट्यांचा जोर कमालीचा वाढला आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराकडून (MLA) काही महिन्यांपूर्वी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षांतील इच्छुकांकडून देखील मिसळ पार्ट्यांचे आयोजन सुरू झाले आहे. आज मध्य नाशिकच्या एका इच्छूक उमेदवाराने (Candidate) मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांच्या बालेकिल्ल्यातच मिसळ पार्टी करून शहरातील दिग्गज नेते व व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक किती काट्याची होईल, याचा अंदाज आजच्या पार्टीतून दिसला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दामदुपट्ट आमिषाने २०० कोटींचा गंडा

दरम्यान महायुती व महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. शहरातील चारही जागा कोण-कोणत्या पक्षाला व कोणत्या व्यक्तीला जातील ते अद्याप निश्चित झालेले नाही. शहरातील सर्वात हॉट समजले जाणारी मध्य नाशिकची (Nashik Central) जागा अद्याप फायनल झालेली नाही. तरीही महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) असो की, महायुती (Mahayuti) दोन्हीकडून इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे वातावरण व निकाल पाहिल्यानंतर महाविकास आघाडीकडे इच्छुकांची जास्त गर्दी झाली आहे.महायुतीच्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीपेक्षा महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे पक्षासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस पक्षातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील मध्य नाशिकची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष दाखवून ३७ लाख उकळले

जिल्ह्यात महायुतीला लवकरच धक्का?

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) महायुतीतील एक मोठा नेता महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात आगामी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका शिवसेनेच्या विद्यमान आमदारांसमोर महायुतीतील एक मोठा नेता लढण्याची तयारी करीत आहे. मात्र महायुतीत सामील असलेल्या त्या पक्षाच्या त्या नेत्याला तिथून तिकीट मिळणे कठीण असल्याने तो नेता शिवसेना ठाकरे किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष किंवा अपक्ष लढण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या