Friday, November 1, 2024
Homeनगरअपक्षांसह अन्य राजकीय पक्षांनी वाढवली श्रीगोंद्यातील निवडणुकीची रंगत

अपक्षांसह अन्य राजकीय पक्षांनी वाढवली श्रीगोंद्यातील निवडणुकीची रंगत

शेवटपर्यंत कोण निवडणूक रिंगणात राहणार याकडे मतदारांचे लक्ष || महायुती, महाविकास आघाडीची डोेकेदुखी वाढली

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दहा वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे तर 21 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. चार तारखेपर्यंत उमेदवारी माघारीसाठी मुदत असून गुरूवारी अर्ज माघारीच्या पाहिल्या दिवशी एकहीजण माघारीसाठी फिरकला नाही. यामुळे आता हेच अपक्ष निवडणुकीची रंगत वाढवतील असे चिन्हे दिसत आहे. निवडणूक रिंगणात राहणार्‍या या अपक्षांचा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना कसा आणि किती फटका बसणार यावर मतदारसंघात चर्चा होताना दिसत आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला जागा सोडल्याने अनुराधा नागवडे उमेदवार आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष अर्ज भरलेला असून निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत. शरद पवार यांनी आपल्याला आशीर्वाद असल्याचे जगताप सांगत आहेत. काँग्रेसचे घन:श्याम शेलार यांनी देखील आघाडी धर्म सोडून हातात प्रहार जनशक्तीचा झेंडा घेतला आहे. यामुळे थेट महाविकास आघाडीचे घटक असलेले हे मातब्बर नेते आता ठाकरे गटाच्या उमेदवार नागवडे यांच्या विरोधात असणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

दरम्यान महायुतीने भाजपच्या प्रतिभा पाचपुते यांना तिकीट जाहीर केले. मात्र, त्यांच्याऐवजी विक्रम पाचपुते यांना उमेदवारी द्यावी, यावर खलबत आणि घडामोडी चालू असताना भाजपचे निष्ठावंत असल्याचे सांगत मैदानात उतरलेले सुवर्णा पाचपुते यांचा अपक्ष अर्ज असल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. तसेच भाजपचे पदाधिकारी असणारे अरविंद कारंजकर यांनी देखील निवडणूक लढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. बेलवंडीचे अण्णासाहेब शेलार विखे समर्थक असले तरी आता वंचितचे उमेदवार आहेत.

याशिवाय अन्य उमेदवारांमध्ये बसपकडून महेंद्र शिंदे, मनसेकडून संजय शेळके, जनहित लोकशाही पक्ष कडून आळेकर गोरख, रासपाकडून दादा कचरे, आरपीआय इंडिया ए गटाचे निलेश गायकवाड, सैनिक समाज पक्षाचे विनोद साळवे, तर अपक्ष म्हणून अजित भोसले, अनिल कोकाटे, वंदना इथापे, ऋषिकेश शेलार, जगताप प्रणोती, टिळक भोस, दत्तात्रय वाघमोडे, नवशाद शेख, निलेश नवले, निवास नाईक, अनंता पवार, पृथ्वीराज नागवडे, पांडुरंग खेतमाळीस, रत्नमाला ठुबे, राजेंद्र नागवडे, राहुल छत्तीसे, सागर कासार यांचे अपक्ष अर्ज आहेत. यात पाचपुतेंच्या घरातील उमेदवार बदलले तर एक अर्ज कमी होईल, नागवडेंच्या घरातील राजेंद्र नागवडे आणि पृथ्वीराज नागवडे यांचे अर्ज कमी होतील. जगताप याच्या घरातील प्रणोती जगताप यांचे अर्ज विड्रॉल होईल असे दिसत आहे. बाकी अपक्षांची मनधरणी कितपत केली जाते याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या