नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik Road
विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वारे सध्या जोरात वाहत असून, पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाची कोणाला उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सध्या सर्व ठिकाणी होत आहे. मात्र, नाशिकरोड (Nashik Road) येथील सध्या चर्चेत असलेले दोन चहाच्या कट्ट्यावर इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या रोजच गप्पा रंगत असून या गप्पांमध्ये कोण उमेदवार होणार पक्का यावरच मात्र चर्चेला चांगले उधाण येत आहे.
हे देखील वाचा : Haryana and J&K Elections Results 2024 : हरियाणात भाजपची तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीची मुसंडी
नाशिकरोड हा विभाग देवळाली व पूर्व विधानसभा मतदारसंघाचा (Deolali Assembly Constituency) महत्त्वाचा भाग मानला जात आहे. सध्या सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीविषयी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सध्या नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) अनुराधा सिनेमागृहासमोर असलेल्या दोन हॉटेलमध्ये रोजच सकाळी चहा पिण्यासाठी जमा होत असलेल्या राजकीय, सामाजिक, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच इतर विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार कोण होणार, कोणाला कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार, उमेदवार कोण निवडून येणार, कोण उमेदवार समर्थ आहे, अशी चर्चा रोजच रंगत आहे.
हे देखील वाचा : Haryana Election Result 2024 : हरियाणात काँग्रेसची पिछेहाट; भाजपाने बहुमताचा आकडा केला पार
सध्या ही चर्चा नवनाथ ग्रुपमध्ये प्रामुख्याने रंगत आहे. या ठिकाणी विविध राजकीय, पक्षाचे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची रोजच मांदियाळी सुरू असून त्यामुळे परिसरात नवनाथ ग्रुपविषयी कुतूहलता निर्माण झाली आहे. या ग्रुपकडून शिक्षक, कामगार, राजकीय, कार्यकर्ता, व्यापारी व विविध क्षेत्रांत नावलौकिक केलेल्या असे अनेक मान्यवरांचे वाढदिवस साजरे केले जातात. तसेच बाजूलाच असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्येसुद्धा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची व इच्छुक उमेदवारांची मांदियाळी सुरू असते. या ठिकाणीसुद्धा जोरदार राजकीय चर्चा सुरू असते. सर्वच राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते आवर्जून या ग्रुपमध्ये हजेरी लावतात. त्यामुळे सध्या हे दोन ग्रुप नाशिकरोडच्या राजकारणाचे प्रमुख स्थान बनले आहे.
हे देखील वाचा : Haryana Election Result 2024 : विनेश फोगाटने विधानसभेचं मैदान मारलं; मिळविला दणदणीत विजय
एकेकाळी नाशिकरोड परिसरात एमडी ग्रुप (MD Group) व वखार ग्रुप म्हणून प्रसिद्ध होता. एमडी ग्रुप म्हणजे बिटको चौकातील हॉटेल महाराष्ट्र या ठिकाणी सर्व क्षेत्रातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमा होत असतं. नाशिकरोड व्यापारी बँकेचे माजी संचालक स्व. भाऊसाहेब पाळदे यांच्या हॉटेलमध्ये हे कार्यकर्ते जमा होत असतं. त्यामुळे राजकीय कार्यकत्यांचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून एमडी ग्रुप हा नाशिकरोडमध्ये प्रसिद्ध होता तर आणखी एक ग्रुप म्हणजे सुभाषरोड येथील वखार ग्रुप म्हणून प्रसिद्ध होता. भूतपूर्व नगरपालिकेतील माजी नगरसेवक अॅड. शांताराम बापू कदम यांचा तो ग्रुप म्हणून ओळखला जात होता. कोणत्या उमेदवाराला विजयी करायचे व कोणाला पाडायचे, याबाबत महत्त्वाची चर्चा या ठिकाणी होत असतं.
हे देखील वाचा : Haryana and J&K Elections Results 2024 : हरियाणात भाजपची तर जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीची मुसंडी
साधारणपणे तीन दशकांपूर्वी या ग्रुपचे नाशिकरोडच्या राजकारणावर वर्चस्व होते. तसेच,ग्रुप आता नवनाथ ग्रुप व दुसऱ्या हॉटेलमध्ये जमणारा ग्रुप म्हणून ओळखला जात आहे. या ठिकाणी बऱ्याच राजकीय चर्चा रोजच होत असतात. त्याचप्रमाणे देवळाली व पूर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणारे उमेदवार ही या ठिकाणी रोजच हजेरी लावत असल्याची चर्चा आहे. चहा पिण्यासाठी एकत्र जमत असलेला ग्रुप नाशिकरोडच्या राजकारणात नवीन दिशा ठरविणारा ग्रुप ठरत आहे. गप्पा आणि कोण उमेदवार होणार पक्का, हीच चर्चा सुरू असते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा