सुरगाणा | वाजीद शेख | Surgana
आदिवासीबहुल मतदारसंघ असलेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात ( Kalwan-Surgana Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) विद्यमान आमदार नितीन अर्जुन (ए.टी) पवार आणि माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित (Nitin Pawar and JP Gavit) यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. महायुतीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तर महाविकास आघाडीकडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुटणार हे स्पष्ट आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा?
मतदारसंघ पुनर्रचनेत कळवण आणि सुरगाणा मतदारसंघ २००९ साली अस्तित्वात आला. त्यापूर्वी कळवण मतदारसंघावर राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय ए. टी. पवार यांचे तर सुरगाणा-पेठ मतदारसंघावर माकपचे जीवा पांडू गावित यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले. मतदारसंघ पुनर्रचनेत मात्र कळवण सुरगाणा मतदारसंघ एकत्र झाल्याने ए. टी. पवार आणि जे. पी. गावित यांना एकमेकांसमोर उभे ठाकावे लागले. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ए. टी. पवार यांनी जे. पी. गावितांचा पराभव केला तर २०१४ च्या निवडणुकीत जे. पी. गावितांनी ए. टी. पवारांचा पराभव केला. दरम्यानच्या काळात ए. टी. पवारांचे निधन झाले.
हे देखील वाचा : नाशकात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता लवकरच ‘तुतारी’ फुंकणार
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ए. टी. पवारांचे सुपुत्र नितीन पवार यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) लढवत जे.पी. गावितांचा पराभव केला. यंदा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार आणि माकपचे जे.पी. गावित यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मतदारसंघात गेल्या पाच वर्षात २२०० कोटी रुपयांची विकासकामे केल्याने मतदार विकासासाठी पुन्हा आपल्याला कौल देतील असा विश्वास विद्यमान आमदार नितीन पवार यांना आहे. तर विविध मुद्यांवर केलेल्या मोर्चे तसेच पेसा भरतीसाठी विविध आंदोलने केलेले आहेत याच आंदोलनाचा फायदा जे. पी. गवितांना मिळू शकतो.
हे देखील वाचा : Ajit Pawar : त्र्यंबकेश्वरमधून अजित पवारांकडून हिरामण खोसकरांच्या उमेदवारीची अप्रत्यक्षपणे घोषणा; म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार नितीन पवारांची उमेदवारी निश्चित आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aagahdi) ही जागा माकपला (CPIM) सोडल्यास जे.पी. गावित हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नसले तरी ही जागा विद्यमान आमदार नितीन पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडेच राहील हे निश्चित आहे. पवार आणि गावित यांच्याव्यतिरिक्त भाजपचे सुरगाणा तालुकाध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक रमेश थोरात यांनी अपक्ष विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. थोरात यांचा नवीनच चेहरा जनतेपुढे दिसत असून त्याचा फटका कुणाला बसणार हा काळच ठरवेल.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : ठाकरेंच्या शिवसेनेचे ३२ उमेदवार जवळपास निश्चित; संभाव्य यादी आली समोर
तर दुसरीकडे एन.डी. गावित आणि भरत भोये, बेबीलाल पालवी हे पण भाजप कडून इच्छुक आहेत. माजी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांची भूमिका निर्णायक तर दुसरीकडे माजी खा. भारतीताई पवार यांची भूमिका गुलदस्त्यात? एकीकडे महायुतीचे शिवसेना शिंदेगट हरिभाऊ भोये, भाजपा एन.डी गावित, सुनील पवार,राजू पवार, नवसु गायकवाड, गोपाळ धूम महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे मोहन गांगुर्डे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिंतामण गावित, भास्कर चौधरी, माकपा इंद्रजीत गावित, भिका राठोड, सुभाष चौधरी, सावळीराम पवार, उत्तम कडू, आदींनी पवार व गावितांना निवडून आणण्यासाठी प्रचार सुरू केले आहेत.
हे देखील वाचा : Ajit Pawar : लाडकी बहीण योजना बंद होणार? अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…
दरम्यान, सध्या तरी कळवण सुरगाणा मतदारसंघात जनतेने निवडणूक (Election) हातात घेतल्याचे दिसत आहे. येत्या निवडणुकीत पवार विरुद्ध गावित असाच थेट सामना राहणार असल्याचे चित्र सध्यातरी आहे. दोन्ही बाजूने निवडणुकीसाठी व्यूहरचना आखली जात आहे. ह्या वेळेची विधानसभा निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. निवडणुकीत पवार की गावित बाजी मारताय! हा येणारा काळच ठरवेल?
गावितांना पारंपरिक प्रतिस्पर्धीचा फायदा?
सुरगाणा तालुक्यातील जेपी गावित यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे चिंतामण गावित आणि शिवसेनेचे मोहन गांगुर्डे यंदा महाविकास आघाडीमुळे एकत्र आले आहेत मात्र त्याचा फायदा करून घेण्यात गावित किती यशस्वी होतात यावरही त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहेसंभाव्य उमेदवारङ्गराष्ट्रवादीकडून आमदार नितीन पवार माकप कडून माजी आमदार जे पी गावित, रमेश थोरात, एन डी गावित, समीर चव्हाण, समीर चव्हाण, बेबीलाल पालवी, तुळशीराम खोटरे यांच्या नावाची चर्चा आहे गीतांजली गुडे, जयश्री पवार, प्रवीण पवार, इंद्रजीत गावित, मोहन गांगुर्डे, चिंतामण गावित, राजेंद्र ठाकरे, देवीलाल पालवी यांची नावे चर्चेत आहेत.
भाजप पवारांना साथ देणार?
लोकसभा निवडणुकीत कळवण तालुक्यातील भाजपला कमी बंधन मिळाले त्यामुळे विद्यमान आमदारांनी युतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा