Tuesday, March 25, 2025
Homeराजकीयविधानसभेला कर्जत-जामखेडमधून अजितदादा रिंगणात उतरणार?

विधानसभेला कर्जत-जामखेडमधून अजितदादा रिंगणात उतरणार?

मुंबई । Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. सर्व पक्षांचे नेते राज्यभरात सभा, दौरे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केले. इतकेच नव्हेतर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कर्जत-जामखेड (Karjat Jamkhed) या मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) रिंगणात उतरू शकतात, असा खळळजनक दावा केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही पवार विरूध्द पवार (Pawar vs Pawar) असा सामना होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा : शेजाऱ्यानेच घात केला! दागिन्यांसाठी वृद्ध महिलेची गळा आवळून हत्या, आरोपी गजाआड

पुण्यात पत्रकार परिषदेत आ. रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात महायुतीकडून मोठ्या प्रमाणात ताकद लावण्यात येत आहे. अनेक उमेदवार माझ्या विरोधात उभे राहू शकतात काही सर्वेक्षणात माझ्या विरोधात अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला उभे करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. भाजपाचा एखादा मोठा नेताही माझ्या विरोधात उभा राहु शकतो. तसेच बारामतीत कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय शरद पवार घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे केले, हा निर्णय चुकला, अशी जाहीर कबुली दिली. त्यावर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्राकाकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असू शकत नाही ही आम्हाला खात्री होती.

हे ही वाचा : वैद्यकीय शिक्षणासंदर्भात PM मोदींची महत्वपूर्ण घोषणा

दादांनी आता ते कबूल केले आहे; मात्र मित्रपक्ष हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगत आहे. आपण चूक झाल्याचं नाव देत असलो तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्याचा दबाव होता आणि आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर आणला आहे, अशीदेखील चर्चा आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...