नविन नाशिक | प्रतिनिधी
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी सीमा हिरे याच योग्य लोक्यतिनिधी होऊ शकतात; कारण हिरेंच सर्वसमावेशक राजकारण, पक्षविरहित समाजकारण लोकांना प्रचंड भावले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी केले.
पांडवलेणी येथील बौद्ध स्मारकात भिक्खू संघाला चिवरदान आणि अन्नदान कार्यक्रमासाठी उपस्थित रिजिजू यांनी सीमा हिरे यांच्या प्रचारावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हिरच्या कामाचे आणि पक्षनिष्ठेचे कौतुक केले. आ. सीमा हिरे यांचे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्या घेत असलेली मेहनत दिल्लीतही कौतुकाचा विषय असल्याचे रिजिजू यांनी यावेळी सांगितले. दरम्यान भाजपा महायुतीच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आ. सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ सोमचारी प्रभाग क्रमांक ३१ आणि ३० मधून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
हे ही वाचा: Nashik Political: भय, ड्रग्जमुक्त नाशिक अन् बेरोजगार युवकांच्या स्वप्नांना बळ
वासन नगर येथील गामने मैदानापासून सुरू झालेली बाईक रॅली आव्हाड पेट्रोल पंप, जीएसटी भवन, इन्कम टॅक्स कॉलनी, पाथर्डी फाटा, प्रशांत नगर, आनंद नगर, नरहरी नगर, अयोध्या कॉलनी, हटिल कशिष, राणेनगर, इंदिरानगर मार्गे जाऊन सुदर्शन लॉन्स येथे रॅलीचा समारोप झाला. या भव्य बाईक रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ठीक ठिकाणी उमेदवार आ. सीमा हिंस्चे महिला वर्गाकडून औक्षण करून स्वागत केले जात होते. कार्यकत्यांकडून भव्य पुष्पहार घालून हिरंचे स्वागत करण्यात आले.
हे ही वाचा: Nashik Political: ॲड. राहुल ढिकले यांना मताधिक्य मिळेल
यावेळी त्यांच्या समवेत भाजपा प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, श्याम बडेदे, भगवान देदि, पुष्पा आव्हाड, संगीता जाधव, सुधाकर जाधव, शोभा सोनवणे, सोनाली ठाकरे, संजय नवले, डॉ पुष्पा पाटील, एकनाथ नवले, गणेश ठाकूर, जितेंद्र चोरडिया, बॅ. राजेश पाटील, गिरीश जोशी, संदीप दंदि, नलिनी दराडे, सुष्मिता लांडगे, शैला देंदि, राव बडगुजर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
याशिवाय सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २८ मधील माऊली लॉन्स, मुरारी नगर, वृंदावन नगर, नवनाथ नगर, डीजीपी नगर दोन, वनश्री कॉलनी आदी भागात भाजपा व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकत्यांनी स्वतंत्र प्रचार रॅली काढली. यात प्रतिभा पवार, सुवर्णा मटाले, अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. विनय मोगल, डॉ. वैभव महाले, निलेश पाटील, शरद फखेळ, बबन सदगीर, अमोल पाटील, डॉ. हां मोगल, कोमल महाले, उत्तमराव मोगल, समाधान दातीर, अरुण दातीर आदिंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा