Saturday, October 12, 2024
Homeनाशिकलासलगाव बाजार समितीत डाळिंबाचे लिलाव

लासलगाव बाजार समितीत डाळिंबाचे लिलाव

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

कांद्याबरोबरच डाळिंब विक्रीसाठी लासलगाव बाजार समिती नावारुपास येणार आहे.

- Advertisement -

येथील बाजार समितीने सुरू केलेल्या डाळिंब लिलावास शेतकरी, अडते व व्यापार्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी म्हटले आहे.

डाळिंबाची विक्री व्हावी, यासाठी लासलगाव कृउबाने चार ते पाच वर्षांपासून डाळिंब लिलाव सुरू केले आहे. चालू हंगामात 13 जुलै ते 28 ऑगस्ट अखेर 61,324 क्रेटस् डाळिंबाची विक्री होऊन बाजारभाव कमीत कमी 170 रु., जास्तीत जास्त 2,100 रु. तर सरासरी 980 रु. प्रती क्रेटस्चे बाजारभाव राहिले आहे.

बाजार आवारावर प्रामुख्याने शेंद्रा, आरक्ता, भगवा या जातीच्या डाळिंबाची आवक होत आहे. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला डाळिंब हा शेतीमाल प्रामुख्याने दिल्ली, बडोदा, अलीगड, पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांसह देशातील इतर बाजारपेठेत पाठविला जात आहे.

सध्या राज्यातील नाशिकसह अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यात डाळींबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात असून लासलगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने भविष्यात डाळींबाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.

डाळिंब विक्रीस सोईचे ठिकाण म्हणून लासलगाव बाजारपेठ शेतकर्‍यांना एक नवा पर्याय निर्माण झाला असून डाळींबाच्या खरेदी-विक्रीस असाच प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात कांद्याबरोबरच डाळिंब विक्रीसाठी लासलगाव बाजार समिती नावारुपास येणार असल्याचे सभापती जगताप यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या