Sunday, September 20, 2026
HomeनगरNewasa : साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू

Newasa : साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू

सोनई |वार्ताहर| Sonai

घोडेगाव-सोनई रस्त्यावरील (Ghodegaon Sonai Road) घोडेगाव इरिगेशन कॉलनीतील तळ्यामध्ये पोहण्यासाठी (Swiming) गेलेल्या तिघांच्या मृत्यू (Death) प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीप रवींद्र काळे (वय 48, रा. घोडेगाव) यांनी सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) खबर दिली की, प्रथमेश सुभाष काळे, जीवन रवींद्र आव्हाड, शोएब आयुब शेख (सर्व रा. घोडेगाव) हे घोडेगाव येथील इरिगेशन कॉलनीतील तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. ते पोहत असताना पाण्यात बुडून (Drowning) मयत झाले असल्याचे खबरीत म्हंटले आहे.

- Advertisement -

घोडेगाव येथील जलजीवन पाणी योजनेच्या साठवण तलावात प्रथमेश काळे, जीवन आव्हाड, शोएब शेख हे शाळकरी मुले पोहण्यासाठी गेली होती, उड्या घेतल्यानंतर काही वेळातच हे मुले बुडाली. त्यांच्याबरोबर आलेल्या रेहान शेख या मुलाने घरी जाऊन हा प्रकार सांगितल्याने नातेवाईकांसह मदत कार्यासाठी परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले. काही वेळातच प्रथमेश काळे व जीवन आव्हाड याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, परंतु शोएब शेख याचा मृतदेह (Dead Body) सायंकाळी उशिरा सापडला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक बिनविरोध व्हावी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सहमतीचे राजकारण आणि सहमतीने निर्णय घेण्याचे ब्रीद जपत गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ वाटचाल करणार्‍या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची आगामी संचालक मंडळाची...