अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
- Advertisement -
निमगाव वाघा (ता. नगर) येथील गाव तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. नसिर शफिक शेख (वय- 18 रा. फकीरवाडा, नगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
ही घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी नासिर व त्याचे दोन मित्र हे निमगाव वाघा येथे गेले होते. तेथील गाव तलावात पोहण्यासाठी तिघे उतरले.
परंतू, नसिरला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच नसिरला वाचविण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केला. परंतू, तलाव मोठा व पाण्याने भरलेला असल्याने नसिर मिळून आला नाही.
यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस व अग्निशमन पथकाचे कर्मचार्यांनी शोध मोहिम सुरू केली. सायंकाळी नसिरचा मृत्यूदेह मिळून आला.