Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : यवतमाळ आणि बीडला पोलिस पथके रवाना

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : यवतमाळ आणि बीडला पोलिस पथके रवाना

पुणे (प्रतिनिधि) –

पुण्यातील वानवडी भागात दहा दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याचा प्रकार

- Advertisement -

उघडकीस आला होता. त्यानंतर या घटनेचा संबंध राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले. दरम्यान, पूजाच्या कुटुंबियांकडून तक्रार न आल्याने या प्रकरणात अधिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. आता पूजा हिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली अशी चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल पाठविण्याचे तर पोळी महासंचलक हेमंत नगराळे यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश पोलिसांना दिले होते. काळ पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा आत्तापर्यंत झालेल्या सर्व तपासाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांना सुपूर्द केला होता.

दुसरीकडे या प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपवरून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. दरम्यान, कोणाचीही तक्रार नसल्याने संशयित कोण याबाबत पोलिस अनभिज्ञ आहेत. त्यामुळे याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पथके यवतमाळ आणि बीडकडे पाठवण्यात आली आहेत. तर ज्यांची सखोल चौकशी करायची आहे अशांना पुण्यात बोलावण्यात आले असून त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या