Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशPooja Khedkar: पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंग कोट्याचा लाभ मिळविल्याप्रकरणी आरोपी असलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला मोठा धक्का बसलाय. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. हायकोर्टाने पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. जामीन अर्ज फेटाळल्याने पुजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार आहे. तसेच तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

पूजा खेकर हिला ऑगस्ट महिन्यात अटकेपासून संरक्षण मिळाले होते. मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे तिच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितले की, याचिकाकर्त्याचे आचरण हे समाजातील वंचित समुहांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे. मात्र त्या वंचित समुहांसाठीच्या तरतुदींचा लाभ घेण्यास पात्र नसल्याचे तपासामधून दिसून येत आहे.

- Advertisement -

तसेच, दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी सांगितले की, पूजा खेडकरची जामीनासाठी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण काढून टाकण्यात आले आहे. खेडकर यांच्यावर प्रथमदर्शनी भक्कम केस आहे. अशा परिस्थितीमध्ये या कटाचा उलगडा होण्यासाठी तपासाची गरज आहे. घटनात्मक संस्था तसेच समाजाची फसवणूक करण्याचे हे अनोखे प्रकरण आहे.’

असे वाटते की, पूजा खेडकर हिने उचलेली पावले ही व्यवस्थेत फेरफार करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग होती. लाखो विद्यार्थी यूपीएसएसी परीक्षेसाठी उपस्थित असतात. या परिस्थितीत तिच्याकडून वापरण्यात आलेली रणनीती अनेक प्रश्न उपस्थित करते. फसवणुकीचे हे उदाहरण केवळ घटनात्मक संस्थाच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक करणारे आहे, असे निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवले.

काय आहे प्रकरण?
IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरवर यूपीएससी परीक्षा २०२२ च्या अर्जामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांचे वकील आणि तक्रारदार युनियन लोकसेवा आयोगाच्या वकिलांनी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला विरोध केला. याप्रकरणी यूपीएससीने खेडकरच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. तपासानंतर यूपीएससीने तिची निवड रद्द केली होती. तिला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. तिला भविष्यातील परीक्षांना बसण्यासही मनाई करण्यात आली.

यूपीएससीने जुलैमध्ये पूजा खेडकरवर कारवाई करण्यास सुरूवात केली. यामध्ये बनावट ओळख दाखवून नागरी सेवा परीक्षा क्रॅक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अपंग व्यक्तींचे हक्क कायद्याच्या तरतुदींनुसार पूजा खेडकरविरोधात गुन्हा नोंदवला. पण पूजा खेडकरने तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...