Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअटकेच्या भीतीनं पूजा खेडकर फरार?परदेशात पसार झाल्याचा अंदाज; पोलीसांकडून शोध सुरु

अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर फरार?परदेशात पसार झाल्याचा अंदाज; पोलीसांकडून शोध सुरु

मुंबई | Mumbai
बडतर्फ केलेल्या पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. मात्र नॉट रिचेबल असलेली पूजा सध्या फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. पूजा खेडकर परदेशात पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्लीतच असलेली पूजा खेडकर दुबईला पळाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांचे पथक परदेशात रवाना होणार असल्याची माहितीदेखील समोर येत आहे. पूजा खेडकर खरेच परदेशात पसार झालीये की भारतातच आहे? याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये.

- Advertisement -

युपीएससीने पूजा खेडकर हिच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर तिने कोर्टात अटकपू्र्व जामीनासाठी याचिका केली होती. गुरवारी पटियाळा कोर्टात याबाबत सुनावणी पार पडली. दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा जामीनअर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून पूजा नॉट रिचेबल आहे. त्यातच आता ती परदेशात फरार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, पूजा खेडकरच्याबाबतीत आणखी एक माहिती समोर येत असून ती म्हणजे पूजा खेडकरने तब्बल सात वेळा आपल्या नावात फेरफार करून IAS होण्यासाठी युपीएससीची परिक्षा दिल्याचे समोर आले आहे. इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकर यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या नावाचे स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर आले आहे. या वेगवेगळ्या नावांचा उपयोग पुजा खेडकरने युपीएससीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी, नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलाय.

इतकेच नव्हे तर तिने तिच्या वडिलांच्या नावांमध्ये सुध्दा फेरफार केल्याचे समोर आले आहे. पूजा खेडकर यांचे रोज नवनविन कारनामे समोर येत असल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या